• Sun. Jul 5th, 2026

    मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा – सार्वजनिक बांधकाम विभाग – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 28, 2026
    मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा – सार्वजनिक बांधकाम विभाग – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्य नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली आहेत. त्यामुळे टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडू शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. या टाक्यांची स्वच्छता शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर व्हायरल झालेला संदेश हा खोटा आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाख्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे की, मागील चार-पाच दिवसांपासून विविध माध्यम तसेच समाजमाध्यमांवर तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर एक संदेश व्हायरल झाला असून ज्यामध्ये मंत्रालयाच्या टाकीमध्ये मांजर मरुन पडल्याचा खोटा संदेश फिरत असल्याचे निदर्शनास आले असून जो खोटा आहे.

    गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्या चेक केल्या असून, सदरच्या टाक्या ह्या १० फूट ते १२ फूट उंच असून सर्व टाक्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार साधारणता १० ते १५ किलो वजनाची लोखंडी झाकणे बसविलेली आहेत, जी पूर्ण वेळ बंद असतात. तसेच मंत्रालयाच्या टेरेसवरील प्रवेश दरवाजा सुध्दा कायम बंद असतो, काही दुरुस्तीची व अत्यावश्यक कामे करावयाची असल्यासच सदर दरवाजा उघडला जातो.

    अशा परिस्थितीमध्ये टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडूच शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. तसेच मंत्रालयाच्या तळ जमिनीखालील पाण्याच्या टाक्या देखील शनिवार दिनांक २५ एप्रिल  २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी साफ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले होते व सर्व टाक्या चेक करुन साफ केलेल्या आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर वायरल झालेला संदेश हा खोटा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    ००००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    Ketan Grandfather Death : लेकाच्या जाण्याच्या दु:खातून सावरले नाही, तोवर अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर, केतनच्या आजोबांचं निधन; विशाल अग्रवालांची भावनिक पोस्ट
    Maharashtra Rain Live Updates 5th July 2026 : मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांचे पावसाचे लाईव्ह अपडेट्स अन् बातम्या एका क्लिकवर वाचा
    IMD Rain Alert: मुंबईत अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, शहराला आजही रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कशी असणार स्थिती?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed