• Sun. Aug 16th, 2026
Rohit Pawar : काळी जादू, बोकड बळी, तीन दिवसांची पूजा ते भोंदूबाबा खरातचं कनेक्शन; अजित पवार प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रोहित पवारांनी काळी जादू, संशयास्पद पूजा आणि बारामतीतील कार्यकर्त्याच्या खरातबरोबरच्या संपर्काबाबत गंभीर आरोप करत CID तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज तीन महिने पूर्ण झाले. या प्रकरणातील तपासावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शरद पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे अपघात झाल्यापासून सर्वांशी चौकशीसाठी भिडत आहेत. अपघात की घात, हा प्रश्न अद्यापही कायम आहे. या प्रकरणी CID तपास चालू आहे. रोहित पवार सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आज रोहित पवार CID कार्यालयात महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही तिसऱ्यांदा आलो आहोत, पण एकही अधिकारी नाही. तपास गंभीरपणे घेतला जात नाही,” असा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा सुरू असल्यामुळे कोणी उपस्थित नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. पुढच्यावेळी आम्हाला इथल्या वॉचमनशी चौकशीवर बोलावे लागेल की काय, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक मुद्दे पुढे आणले. बारामतीतील एका छोट्या नेत्याचे नाव अप्रत्यक्षपणे जोडले आहे. बारामतीतील अजित पवारांच्याच पक्षातील एक कार्यकर्ता अशोक खरातला भेटायला जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला. त्याचा पुढील तपास करण्यात यावा अशी देखील मागणी केली आहे. या नेत्याचे आर्थिक व्यवहार आणि काही संशयास्पद संपर्क असल्याचा आरोप त्यांनी केला.

याचबरोबर, काटेवाडी परिसरात २७, २८ आणि २९ तारखांना काही पूजा झाल्याचा उल्लेख करत त्यांनी काळ्या जादूचा संशयही व्यक्त केला. या पूजांमध्ये बोकड बळी दिल्याचीही चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही यावर विश्वास ठेवत नाही, पण एकाच घराबाहेर सलग तीन दिवस पूजा का झाल्या?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका शेतकऱ्याला पवार कुटुंबावर मोठा आघात होईल, असा इशारा देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.

Maharashtra TimesMarathi Compulsion : मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत, पण नियम तोडणाऱ्यांवर 1 मे पासूनच कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

तपास यंत्रणांवरही त्यांनी टीका केली. DGCA आणि AIB कडून माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी ब्लॅक बॉक्स (CVR आणि FDR) संदर्भात उशिरा माहिती देण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अमेरिकेची NTSB संस्था या प्रकरणाचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“मोठ्या नेत्यालाही न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाचं काय?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात दोषींना सोडणार नसल्याचा इशारा दिला. तसेच काही नेत्यांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा