• Sat. Jun 6th, 2026
    Nashik TCS Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात थेट ‘मलेशिया’ कनेक्शन; कोर्टातील नव्या माहितीने खळबळ, काय प्लॅन होता?

    Nashik Crime: याप्रकरणी आता आर्थिक गैरव्यवहार आणि आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    नाशिक धर्मांतर प्रकरणाते थेट ‘मलेशिया’ कनेक्शन; कोर्टातील नव्या माहितीने खळबळ, काय प्लॅन होता?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाला आता आणखी धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशिया आणि मालेगावपर्यंत पोहोचले असल्याचा दावा विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा उलगडा झाल्ायने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी नाशिकरोड न्यायालयात या प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपासातील धक्कादायक माहिती उघड केली आहे. पीडित महिलेचे नाव बदलून तिला बनावट ओळखीद्वारे मलेशियामधील ‘इम्रान ‘ नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा मोठा कट रचला गेल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले.

    बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष या दोन्ही बाजूंच्या बराचवेळ झालेल्या युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल २ मे पर्यंत राखून ठेवला आहे, तोपर्यंत आरोपी निदा खानवरील अटकेचे संकट कायम आहे. तपास यंत्रणांकडून आता या प्रकरणातील डिजिटल पुरावे, बँक खात्यांचे तपशील आणि सीमापार पसरलेले नेटवर्क यांचा सखोल तपास करत आहे. सदर गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने आगामी काळात आणखी काही मोठी नावे आणि कनेक्शन समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मांसाहार करण्याची बळजबरी

    बहुराष्ट्रीय कंपनीत एका तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नात संशयितांनी वारंवार हॉटेलांत नेऊन तेथे मांसाहार करण्याची बळजबरी केल्याचे पीडित तरुणाने पोलिसांत दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. संशयितांनी धमकी दिल्याबाबत या तरुणाने कंपनीची ‘एजीएम’ अश्विनी चैनानी हिलादेखील कळवले होते. संशयितांनी पीडिताला हॉटेलात नेण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. दोनपैकी एक कार संशयितांपैकी एकाने यापूर्वी भंगारात काढली असून, पोलिस त्याबाबतही शोध घेत आहेत.

    कंपनीतील विवाहित तरुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात संशयित तौसिफ बिलाल अत्तार (वय ३७), दानिश एजाज शेख (वय ३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (वय ३४) व रझा रफीक मेमन (वय ३५) यांना नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘एसआयटी’ने अटक केली आहे.

    दरम्यान, कंपनीतील प्रकरणांबाबत आठ गुन्हे नोंद आहेत. त्यानुसार संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, चैनानी हे नाशिकरोड कारागृहात आहेत. संशयित निदा खान ही पसार असून, तिला न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले नाही.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा