Eknath Shinde Shivsena News: जर बच्चू कडू यांना उमेदवारी द्यायचीच असेल, तर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा, अशी स्पष्ट अट काही नेत्यांनी मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एकनाथ शिंदे एकाच वेळी काँग्रेससह भाजपला धक्का देणार? बच्चू कडूंना मोठी ऑफर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मूळचे शिवसैनिक असलेले आणि नंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले बच्चू कडू सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. प्रहार संघटनेचे जाळे आणि लोकांमध्ये असलेली त्यांची प्रतिमा ही त्यांच्या आंदोलनांमुळे आहे. पक्ष विलीन केल्यास संघटनेची स्वतंत्र ओळख संपेल आणि कार्यकर्त्यांवर मर्यादा येतील, अशी भीती प्रहारमधील एका गटाला वाटते. तर, सत्तेत सहभागी होऊन प्रगत होण्यासाठी हा मार्ग योग्य असल्याचे दुसरे मतही व्यक्त होत आहे. १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. अशातच, शिवसेनेला पक्षातली नाराजी शमवून आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. विदर्भातील वर्चस्वासाठी बच्चू कडू यांना सोबत घेणे राजकीयदृष्ट्या ‘मास्टरस्ट्रोक’ ठरू शकतो, पण त्यासाठी ‘प्रहार’च्या विलीनीकरणाची अट बच्चू कडू मान्य करणार का, यावरच या सर्व नाट्याचा शेवट अवलंबून असेल.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेतील काही मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. शिवसेनेत नसलेल्या नेत्याला उमेदवारी देण्याच्या हालचालीमुळे पक्षात खदखद वाढली असल्याची माहिती आहे.
मुंबईत विधान परिषद निवडणुकीच्या घडामोडींवर उच्चस्तरीय बैठकींत चर्चा सुरू असताना, अमरावती आणि विदर्भात वेगळीच समीकरणे आकार घेत आहेत. बच्चू कडू यांचा प्रभाव विशेषत: अमरावती पट्ट्यात लक्षणीय आहे. दिव्यांग, शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख असल्याने, त्यांच्या माध्यमातून शिवसेनेला विदर्भात पाय रोवण्याची संधी दिसते. सध्या या भागात भाजप आणि काँग्रेसचा दबदबा असल्याने, कडूंचा प्रवेश शिवसेनेसाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. तथापि, प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांत या संभाव्य विलीनीकरणाबाबत मतभेद स्पष्ट दिसत आहेत. पक्षाची स्वतंत्र ओळख संपेल या भीतीमुळे एक गट नाराज आहे, तर दुसरा गट सत्तेत सहभागाची संधी म्हणून या प्रस्तावाकडे पाहत आहे. त्यामुळे कडूंसमोर संघटन टिकवायची की सत्तेत स्थान मिळवायचे, असा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे मुंबईत रणनीती आखली जात असताना, अमरावतीत कडू समर्थकांची चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका, स्थानिक पातळीवरील चर्चांमधून अंतिम भूमिकेचा अंदाज घेतला जात आहे. या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत केवळ आकडेमोड नव्हे, तर संघटनात्मक विस्तार आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा मोठा डाव दडलेला असल्याचे स्पष्ट होत आहे. आता शिंदेंची ही चाल पक्षाला बळ देणारी ठरते की अंतर्गत नाराजी वाढवणारी, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा