Accident News : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पांगरी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नकार्य आटपून घरी परतत असताना नियतीने दोन कुटुंबांचे कमावते आधार हिरावले असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
देवरुख पांगरी येथे भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातही अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे असाच एक दुर्दैवी अपघात देवरुख पांगरी येथे झाला आहे देवरुख येथून लग्नकार्य आटपून घरी परतत असताना दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रत्नागिरी जवळील हातखंबा गावात शोककाळा पसरली आहे निष्ठूर नियतीने दोन कुटुंबांचे कमावते हातच असलेले आधार हिरावून नेले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की सुमित विलास कांबळे (वय 35) आणि विकास काशीराम कांबळे (वय 38, दोघेही हातखंबा) या दोन्ही तरुणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेत तिसरा एक तरुण गंभीरित्या जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हातखंबा येथील राहणारा सुमित कांबळे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदयनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात सुमित याला तीन लहान मुली आहेत सुमितच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधारच हरपला आहे. पत्नीला झालेल्या पती वियोगाबरोबरच तीन लहान मुलींचा बाप निष्ठुर नियती हिरावून घेतल्याने तीन मुली पोरक्या झाल्या आहेत.
दुसरा तरुण असलेला विकास काशीराम कांबळे याचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. विकास उत्तम वाहनचालक होता तो वाहन चालक म्हणून एका ठिकाणी खाजगी नोकरी करत होता. वाहन चालकाची नोकरी करून तो कुटुंबासाठी हातभार लावत होता त्याच्या पश्चात पत्नी दोन पुतळे भाऊ जय असा परिवार आहे या कुटुंबाचाही एक करता आधार हरपला आहे. विकास व सुमितच्या मृत्यूमुळे कांबळे कुटुंब शौकसागरात बुडाल आहे कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणार होता.
Pune News : पुण्यातील नामांकित विधी महाविद्यालयावर मोठी कारवाई! विद्यार्थ्यांना व्याजासह पैसे परत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश
रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात देवरुख पांगरी येथील अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे हातखंबा आणि कांबळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातखंबा येथील तीन तरुण देवरुख येथील विवाह सोहळ्यासाठी गेले होते. हा विवाह सोहळा आटपून ते घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज यांच्या संस्थांची रुग्णवाहिका तसेच स्थानिक नागरिक पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. या घटनेतील गंभीरित्या जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा