• Sat. Jun 6th, 2026
    Pune Accident: पुण्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेने कारचा चक्काचूर, नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू

    हायवा डंपरने एस कॉर्नर वळणावर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलट दिशेला फेकले गेले.

    पुण्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेने कारचा चक्काचूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील एस कॉर्नर परिसरात हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महसूल विभागातील अधिकारी अनंता गवारी हे आपल्या होंडा सिटी कारने बनकरफाटा दिशेने जात होते. त्याच वेळी समोरून पांगरीमाथा बाजूकडून येणाऱ्या हायवा डंपरने एस कॉर्नर वळणावर कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन उलट दिशेला फेकले गेले.

    अपघातात अनंता गवारी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले महसूल कर्मचारी विजय खारतोडे यांनाही गंभीर दुखापत झाली, तर तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बाहेर काढून ओतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलवण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात नेत असतानाच नायब तहसीलदार अनंता गवारी यांची प्राणज्योत मालवली.

    घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. संबंधित डंपर एका खडी व बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपनीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    या अपघाताबाबत स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी हा अपघात केवळ रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे सांगितले, तर काहींनी वळणदार रस्ता, जड वाहनांचा वाढता वेग आणि अपुरी सुरक्षितता यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे हा अपघात नेमका अपघाती होता की अन्य काही कारण आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

    दरम्यान, ओतूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून वाहनांची तांत्रिक तपासणी आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा