Mumbai-Bengaluru Vande Bharat: देशातल्या दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची तारीख अखेर ठरली आहे. मुंबई ते बंगळुरूदरम्यान ही सेवा सुरू होणार असून रेल्वे मंत्र्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई ते बंगळुरू प्रवास आता सोपा होणार आहे. दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला सुरूवात होणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्यातच या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा शुभारंभ होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केएसआर बंगळुरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या स्थानकांदरम्यान हे सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
24 तासांचा प्रवास 15 तासांत
अनेक वर्षांपासून मुंबई ते बंगळुरू प्रवासासाठी केवळ उद्यान एक्सप्रेसचा पर्याय उपलब्ध होता. या ट्रेनने बंगळुरूपर्यंत पोहोचायला 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. पण वंदे भारतमुळे हा वेळ फक्त 15 तासांवर येणार आहे. रात्री उशीरा ही ट्रेन स्थानकावरून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत दाखल होईल. त्यामुळे एका रात्रीत मुंबई ते बंगळुरू प्रवास शक्य होणार आहे. सोलापूर आणि कालाबुर्गी मार्गे ही ट्रेन धावणार आहे.Mumbai-Ahmedabad Bullet Train: ‘बुलेट ट्रेन’साठी रुळ बसवण्याचा कामाला वेग, पहिल्यांदाच जपानी प्रणालीचा वापर; मुंबईत भुयारी बुलेट स्थानक
यावेळी बोलतना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातल्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या यशाबद्दल सांगितलं. कोलकाता मधील हावडा ते गुवाहटीमधील कामाख्यादरम्यान ही ट्रेन सुरू झाली होती. या स्लीपर ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या ट्रेनमुळे प्रवास वेगवान आमि आरामदायी झाला आहे. या नंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुरूवात जुलै ते ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता आहे.
सुपर फास्ट ट्रेनची घोषणार
दरम्यान, रेल्वे प्रशासन मुंबई ते बंगळुरूदरम्यान एका तिसऱ्या मार्गाचीही सुरूवात करण्याचा विचार करत आहे. हुबळी आणि पुणे मार्गावरून बंगुळूरू ते मुंबई सुपर फास्ट ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. या ट्रेनमध्ये एलएचबी कोच उपलब्ध असतील. या सुपर फास्ट ट्रेनने सुद्धा रातोरात मुंबईहून बंगळुरूला पोहोचता येणार आहे.
Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) तंत्रज्ञानाचा वापर करून बीईएमएलने ही वंदे भारत ट्रेन विकसित केली आहे. नवीन केशरी आणि राखाडी रंगाची ही ट्रेन केएसआर बेंगळुरू आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई दरम्यान धावणार आहे. ही देशातील अशी दुसरी ट्रेन असेल. जानेवारी 2026 मध्ये सुरू झालेली पहिली वंदे भारत स्लीपर हावडा ते कामाख्या दरम्यान धावते. यामुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ सहा तासांपर्यंत कमी झाला आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन वाढवण्यात आले असून डिसेंबर 2026 पर्यंत अशा 12 गाड्या सुरू होण्याची अपेक्षा आहे. या ट्रेनच्या प्रत्येक बाजूला सहा रेक असतील.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा