• Mon. Jun 15th, 2026
    Mumbai Crime : गोड बोलून ओळख केली, महिला क्रिकेटरने मुंबईतील तरुण उद्योगपतीला जाळ्यात अडकवलं; धमकी देऊन 63 लाख उकळले

    Mumbai Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच मुंबईतील कुलाबामध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    जम्मू काश्मीर महिला क्रिकेटर उद्योगपती फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका उद्योगपतीला एका महिला क्रिकेटरनं सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला क्रिकेटपटूनं या उद्योगपतीकडून तब्बल 63 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं संबंधित महिला क्रिकेटर आणि तिच्या भावासह आणखी एका जणाला अटक केली आहे. या महिला क्रिकेटरचं नाव फारखांदा खान असून ती जम्मू-काश्मीरची असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार उद्दीन वाणी यांना अटक केली आहे. फरखांदा खान ही जम्मू काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. ती महिला टी-20 लगीमध्येही सहभागी झाली होती.

    व्यावसायिकाचा पैसे देण्यास नकार

    मिळालेल्या माहितीनुसार, फारखांदा आणि तिच्या भावाला दिल्लीतील एका हॉटेलमधून तर साथीदार इम्तियाज वाणी याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाब्यात वास्तव्यास असलेला 28 वर्षीय व्यावसायिक 2024 मध्ये काही काळ पश्चिम उपनगरात वास्तव्याला होता. त्यावेळी तो फारखांदा हिच्या संपर्कात आला होता. कालांतराने दोघांमध्ये जवळीक वाढली. 2024 मध्ये फारखांदाने व्यवसायिकाकडून पैशांची मागणी केली असता व्यावसायिकानं तिला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा फारखांदाने त्याला धमकावण्यास सुरुवात केली.
    Maharashtra TimesWeather Forecast: मुंबई परिसर तापणार, मात्र काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार; IMD चा ताजा अंदाज

    ‘तुला जेलमध्ये पाठवेन’

    पैसे न दिल्यास दोघांचे मोबाईलवरील चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी देऊन फारखांदा हिने पैसे उकळण्याचा आरोप या तरुण उद्योगपतीने केला आहे. सुरुवातीला व्यवसायिकाने 23 लाख आणि त्यानंतर तब्बल 40 लाख दिल्याचे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. एप्रिल 2024 पासून व्यावसायिकाकडून पैसे उकळणं सुरू असल्याची माहिती आहे.
    Maharashtra TimesRohit Pawar: बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते; मतदान करून बाहेर पडताच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
    फारखांदा खान हिने या उद्योगपतीकडून घेतलेले काही पैसे इम्तियाज वाणीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. काही पैसे वडील आणि भावाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. फारखांदा हिचा भाऊ बाझिल हा देखील संबंधित उद्योगपतीला सातत्यानं धमकावत होता. ‘तुला जेलमध्ये पाठवेन’, अशी धमकी देत होता. या सगळ्यांनी उद्योगपतीला कसं जाळ्यात अडकवलं? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अजूनही फारखांदा, तिचा भाऊ आणि साथीदाराची चौकशी करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा