• Sun. Jun 7th, 2026
    Nagpur Crime: डोक्यावर घाव, हातावर ‘हरीओम’ टॅटू; दोन दिवसांपासून बेपत्ता हॉटेल मालकाची पोत्यात आढळली बॉडी

    Nagpur Crime: नारातील नदीच्या पुलाखाली पोत्यात एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हातावरील टॅटूमुळे व्यक्तीची ओळख पटली.

    नागपुरात हॉटेल मालकाला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: धारदार शस्त्राने वार करून हॉटेल मालकाचा खून करण्यात आला. नंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून पुलावरून फेकून देण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरात उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

    राहुल सुनील शाहू (वय ३८, रा. झिंगाबाई टाकळी), असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, राहुल आधी मोबाइल शॉपी चालवित होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सदरमधील अचरज टॉवर येथे ‘हॅपी स्टे’ नावाचे हॉटेल चालवायला घेतले. हॉटेल व्यवसायासह ते प्रॉपर्टी डिलिंग व भिशी चालवायचे. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते कर्मचाऱ्यांना पैसे आणायला जात असल्याचे सांगून दुचाकीने बाहेर गेले. रात्र होऊनही ते परतले नाहीत. नातेवाइकांनी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. त्यांचा मोबाइलही बंद होता. नातेवाइकांनी अखेर जरीपटका पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी मंगळवारी राहुल हे बेपत्ता असल्याची नोंद घेतली.

    Maharashtra TimesNagpur Crime: पतीसोबत घटस्फोट, प्रियकरासह लिव्ह इनमध्ये राहायला, पण 7 वर्षांत सगळं संपलं; महिलेसोबत काय घडलं?
    बुधवारी दुपारी नारातील नदीच्या पुलाखाली पोत्यात मृतदेह असल्याची माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतकाच्या डोक्यावर व कानामागे शस्त्राचे घाव होते. हातावर ‘हरीओम’ असे गोंदलेले होते. यावरून राहुल यांची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून त्यांचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता सोमवारी मध्यरात्री एक कार पुलावर थांबली.

    भाजपच्या मोर्चात महिला गिरीश महाजनांवर भडकली, व्हायरल व्हिडिओनंतर काँग्रेसची बोचरी टीका

    कारमधून दोन ते तीन जण उतरले व त्यांनी राहुल यांचा मृतदेह असलेले पोते पुलावरून खाली फेकल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. आर्थिक व्यवहारातून राहुल यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा