Nashik Leopard Attack : गावकऱ्यांनी चिमुकलीचा शोध घेण्यासाठी आसपासची शेते धुंडाळली असता रात्री नऊच्या सुमारास रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत मुलीचा मृतदेह आढळून आला.
वलखेड येथे बळवंत शिंदे यांच्या शेतात विलास गिरिधर मोरे हे शेतमजुरी करतात. मंगळवारी रात्री घरासमोरील शेडमध्ये आई-वडील आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरी बसलेले होते. यावेळी शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ज्ञानेश्वरीवर झडप घातली. तिला जबड्यात पकडून शेतात ओढून नेले. हे पाहताच शेजारी व परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र, बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला होता.
Saptashrungi Devi Temple: आदिशक्तीच्या दरबारात चोरी! सप्तश्रृंगीच्या गर्भगृहातील प्रकार, तब्बल 23 किलो चांदी गायब, कोणाचं कारस्थान?
बालिकेचे शव उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर रात्री शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वनक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल भट्ट, वनरक्षक गोरख गांगोडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik Crime : ‘मला पण एक सिगारेट घे रे’; नकार देताच बेदम मारहाण, नाशिकमध्ये तरुणाला मध्यरात्री संपवलं
बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
येवला : तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने दोन ठिकाणी पिंजराही लावला. मात्र, बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला नाही. शेतकरी निवृत्ती पांडुरंग मढवई यांनी आपल्या मोकळ्या झालेल्या कांद्याच्या शेतात गाय बांधून ठेवली होती. बुधवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास बिबट्याने या गायीवर हल्ला केला. हल्ल्यात गाय ठार झाली. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पंकज नागपुरे, भाऊसाहेब माळी, गणेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत पंचनामा केला. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजाराम मढवई, नामदेव मढवई, भागवत खराटे, संदीप खराटे यांनी केली आहे.
