• Sat. Jun 6th, 2026
    Egg Price : पारा चाळिशी पार, तरीही अंड्यांचे दर अजूनही चढेच, भाव 72 वरुन 84 अन् 84 वरुन पुन्हा 72 रुपये डझनावर

    ऊन कडाक्याचं पडत आहेत. उन्हाचा पारा चाळिशी पार गेला आहे. तरीही छत्रपती संभाजीनगर येथे अंड्यांचे दर हे अजूनही चढेच असल्याचं बघायला मिळत आहे. सध्या तरी हे दर 72 ते 84 रुपयांच्या दरम्यान बघायला मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : अंडी ही अनेकांना आवडतात. अनेकांना उकळलेली अंडी रोज खायला आवडतात. तर अनेकांना अंड्याची भुर्जी किंवा खिमा खायला आवडतो. अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे कोट्यवधी नागरिक दररोज अंडी खातात. पण अंड्यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. हे भाव उन्हाळ्यात तरी कमी होतील, असा अंदाज बांधला जातो. उन्हाळ्यात उष्णता अधिक असते, अशावेळी अंडी खालल्याने शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊ नये किंवा शरिराला गरम पडू नये म्हणून बरेच जण अंडी खाणे कमी करतात. याशिवाय इतरही काही कारणे आहेत. त्यामुळे संसाधनांची मागणी कमी झाली तर त्याचे दरही कमी होतात, असं समीकरण आहे. पण यावर्षी अंड्यांच्या किंमती अद्याप हव्या तशा कमी झालेल्या बघायला मिळत नाही.

    सर्वसाधारपणे एप्रिल, मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात अंड्यांची मागणी कमी होऊन ६०-६५ रुपये डझनाच्या घरात भाव येतो. मात्र अजूनही भाव ७२ ते ८४ रुपयांच्या घरात कमी-जास्त होताना दिसून येत आहे. पुढील महिन्यापर्यंत मात्र भाव आणखी कमी होऊ शकतो, असेही विक्रेत्यांनी आवर्जून सांगितले.

    प्रथिनांचा भक्कम स्रोत म्हणून अंड्यांकडे बघितले जाते आणि विविध कारणांसाठी दैनंदिन आहारामध्ये अंड्यांचाही समावेश केला जातो. पुन्हा वाढच्या वयात मुलांना अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. अलीकडे तर आहारतज्ज्ञांकडूनही अंडी खाण्याबाबत मार्गदर्शन केले जाते आणि बाराही महिने अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे सहजत लक्षात येत आहे. याच एकंदर स्थितीमुळे अंडी खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात दररोज सुमारे पाच लाख अंडी फस्त होत आहेत.

    हिवाळ्यात तर मागणी दीड पटीने वाढते, असेही समोर आले आहे. अर्थात, उन्हाळ्यात मागणी कमी होते आणि त्यामुळे दरही बरेच कमी होतात, असे दरवर्षीच पाहायला मिळते. मात्र सध्या तरी अंड्यांची ७२ रुपये डझनाने विक्री होत आहे. विशेष म्हणजे मोजक्या काही दिवसांपूर्वीच हा भाव ८४ रुपये डझनावर गेला होता आणि त्या आधीही हा भाव ७२ रुपये डझनापर्यंत होता. पुढील महिन्यापर्यंत हाच भाव आणखी कमी होण्याची शक्यता असली तरी, प्रत्यक्षात किती कमी होतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

    ८० टक्के आवक हैदराबादहून

    शहर परिसरात सुमारे ८० टक्के अंड्यांची आवक ही हैदराबादहून होते, तर २० टक्के आवक ही जालना व स्थानिक पातळीवरुन होते. सुमारे ३० हजार ट्रे म्हणजेच पाच लाख अंडी शहर परिसरात येतात आणि हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत आवक आणखी वाढते, याकडे अंड्यांचे घाऊक विक्रेते गौरव पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

    “वाढत्या उन्हामध्ये कोंबड्यांची संख्या काहीशी घटते आणि त्यामुळे आवक कमी होऊन दर वाढू शकतात. सध्या सर्वत्र तापमान चाळिशीपुढे गेले आहे आणि त्याचा फटका कोंडब्यांना बसू शकतो”, अशी प्रतिक्रिया घाऊक विक्रेते गौरव पाटील यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा