Mumbai-Pune Expressway Megablock : डोंगरगाव आणि कुसगाव परिसरातील एका नवीन पुलाच्या रंगकामासाठी आणि शटरिंग काढण्याच्या तांत्रिक प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या तांत्रिक कामामुळे महामार्गावरील वाहतूक काही ठराविक तासांसाठी पूर्णपणे थांबवली जाणार आहे.
मुंबई पुणे महामार्ग ट्रॅफिक मेगाब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत असाल तर जरा थांबा. कारण उद्या आणि परवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 3 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत पुलाच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. 23 एप्रिलला मुंबईकडे जाणारी तर 24 एप्रिलला पुण्याकडे जाणारी वाहतूक 3 तासांसाठी बंद राहील. या कालावधीत वाहने जुन्या महामार्गावरून वळवली जातील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेचं नियोजन करूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुलावर दुरुस्ती व रंगकामाची कामे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. डोंगरगाव/कुसगाव (कि.मी. 58/500) येथील पुलावर दुरुस्ती व रंगकामाची कामे केली जाणार असल्यानं दोन दिवस काही वेळासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजे गुरुवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या वेळेत सर्व वाहने किवळे, देहूरोड आणि तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरून कुसगाव टोल प्लाझामार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार आहेत. Girish Mahajan: ती महिला वाटेल तसं बोलली, शिव्या दिल्या; वरळीत आंदोलनावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांनी सांगितलं
पर्यायी मार्ग कसा असेल?
तसेच 24 एप्रिल 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या काळात वाहनs कुसगाव टोल प्लाझामार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहूरोड व किवळे मार्गे पुण्याकडे वळवली जातील. या ब्लॉकमुळे त्या वेळेत प्रवास करणाऱ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी आपला प्रवास आधीच नियोजित करावा आणि शक्य असल्यास दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. Pune News : तुला डिजिटल अरेस्ट करतोय, पिंपरीतील तरुण फसला, 12 लाख द्यायला निघाला, 80 वर्षीय वडिलांची जागरुकता, भामट्यांचा डाव उधळला दरम्यान उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान काही अडचण आली तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष (9822498224) किंवा महामार्ग पोलीस (9833498334) यांच्याशी संपर्क साधता येईल. हा ट्रॅफिक ब्लॉक आवश्यक देखभाल कामांसाठी घेण्यात आला असून भविष्यात रस्त्यावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी ही कामे महत्त्वाची असल्याचे MSRDC कडून सांगण्यात आले आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा