Pahalgam Attack One Year Complete : सन 2024 मध्ये पर्यटकांच्या संख्खेने उच्चांक गाठला होता. सुमारे 2.35 कोटी पर्यटकांनी राज्यात भेट दिली होती. ‘वादी खुशहाल हैं, बेखौफ होकर आए’ अशी आर्त साद स्थानिकांनी पर्यटकांना घातली आहे.
‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो’
‘पहलगाम दहशतवादी हल्ला’ या घटनेला एक वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पहलगाममधल्या युवकांशी संवाद साधताना, अद्यापही सर्व काही सुरळीत झाले नसल्याची जाणीव होते. पहलगामचा रहिवासी सबझार भट म्हणाला, ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो. आम्हा स्थानिकांना या घटनेने काय यातना दिल्या, ते शब्दांत सांगणे कठीण आहे. विविध राज्यातल्या ज्या पर्यटकांशी आमचे कौटुंबिक सौहार्दपूर्ण नाते तयार झालेले, ज्यांना आग्रहाने आम्ही आमच्या घरीही नेतो, त्यांना कुठल्या तोंडाने पुन्हा या म्हणायचे, असे वाटते. ‘पहलगाम’ या गावी लोक येतात; पण मुक्कामी थांबत नसल्यामुळे इथल्या पर्यटनावर, बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम कायम आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा असल्याने बिनधास्त यावे, असे आम्ही सांगू शकतो. आमच्या जीवापेक्षा पर्यटकांच्या सुरक्षेचे मोल अधिक आहे, याची जाणीव आहे. बैसरन हा पॉइंट बंद आहे. मात्र, इतर सगळे पर्याय खुले आहेत. बेताब व्हॅली, आरू व्हॅली, ममलेश्वर मंदिर, चंदनवाडी, लिद्दर नदी, शेषनाग लेक परिसर इथं तुम्ही जाऊ शकता. अमरनाथ यात्रेची तयारीही सुरू आहे.’
Pune Bus Accident CCTV : PMPMLचा ब्रेक अचानक फेल, भरधाव बस लग्नपत्रिकेच्या दुकानात शिरली; पुण्यात भीषण अपघात
काश्मीरमध्ये यायला काहीच हरकत नाही
श्रीनगर येथे हाउसबोट आणि पर्यटन नियोजन करून देणारे तौसिफ कोटरू म्हणाले, ‘श्रीनगरसह, सोनमर्ग, गुलमर्गला पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे. पर्यटकांची संख्या हळूहळू वाढते आहे. पहलगामला लोक मुक्कामी न थांबता एका दिवसात धावती भेट देऊन परत येत आहेत. सोनमर्ग-गुलमर्गमध्ये सध्या सर्वाधिक गर्दीचं वातावरण आहे. सुरक्षाव्यवस्था कडेकोट असल्यामुळे पर्यटकांनी काश्मीरमध्ये यायला काहीच हरकत नाही.’
‘काश्मीरमध्ये वारसा सहलींनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील युवा पर्यटकांना काश्मीरची ओढ आहे. पूर्वी सहकुटुंब सहलींचे प्रमाण अधिक होते. आता विद्यार्थ्यांचे ग्रुप, कॉलेजियन्स स्वतंत्रपणे काश्मीरला भेट देत आहेत,’ असे काश्मीरमध्ये वारसा सहल आयोजित करणाऱ्या श्रीनगर येथील नम्रता वाखलू यांनी सांगितले.
Pahalgam Attack : पतीला धर्म विचारुन संपवलं, मनात येतं दहशतवाद्यांशी लढून त्यांना वाचवू शकले असते तर… प्रगती संतोष जगदाळेंची जखम अजूनही भळभळती
गुरेझ, केरन, किशनगंगा…
‘काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सध्या भारत-पाक सीमेवरील गुरेझ, केरन आणि तिथवाल येथील शारदापीठ (किशनगंगा व्हॅली) या ठिकाणांनाही पसंती मिळतेय. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथवालच्या शारदा पीठला वर्षभरात दहा हजार भाविकांनी भेट दिली. काश्मीरमधल्या पर्यटनावर परिणाम झालेला असला, तरी आता भाविक आणि पर्यटक पुन्हा परतत आहेत,’ अशी माहिती तिथवाल शारदापीठाचे रवींद्र पंडिता यांनी दिली.
