• Sat. Jun 6th, 2026

    Beed Crime: बीडमधील महिला घरातून बेपत्ता; दोन दिवसांनी तलावात बॉडी आढळली, घटनेनं कुटुंबाला धक्का

    Beed Crime: बीडमधील महिला घरातून बेपत्ता; दोन दिवसांनी तलावात बॉडी आढळली, घटनेनं कुटुंबाला धक्का

    Beed News: “एक चांगल्या स्वभावाची व्यक्ती आपल्यातून निघून गेली,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    बीडमध्ये खळबळ: दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा तलावात आढळला मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: शहरातील धोंडीपुरा भागातील थिंगळे गल्ली येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेचा दोन दिवसांनंतर दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. शशिकला अशोक जाधव असे या मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी घोडका राजुरी तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला जाधव या गेल्या दोन दिवसांपासून आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या थिंगळे गल्ली येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत, तसंच त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बीड शहराच्या विविध भागात तसंच संभाव्य ठिकाणी त्यांचा कसून शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी पोलिसातही माहिती देण्यात आली होती.

    तलावात आढळला मृतदेह
    सोमवारी दुपारच्या सुमारास घोडका राजुरी तलावाच्या परिसरात काही ग्रामस्थांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शशिकला जाधव यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    परिसरात शोककळा
    शशिकला जाधव या अत्यंत मनमिळावू, शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या महिला होत्या. आपल्या परिसरात त्या सर्वांशी मिळूनमिसळून वागत असत, त्यामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने धोंडीपुरा आणि थिंगळे गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.

    पोलीस तपास सुरू
    घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. शशिकला जाधव तलावापर्यंत कशा पोहोचल्या? ही आत्महत्या आहे की घातपात? बेपत्ता होण्यामागे काही कौटुंबिक किंवा मानसिक कारण होते का? असे प्रश्न उपस्थित होत असून सध्या तरी या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा