Pune Murder Case पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुणे हादरलं! भिडे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ नदीपात्र परिसरात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास नदीपात्रात काही नागरिकांना मृतदेह दिसून आला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने पाहणी केली असता, मृत तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. प्राथमिक तपासात दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना पुणे महानगरपालिकेच्या समोर असलेल्या मुठा नदीपात्र परिसरात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी शिवाजीनगर, शनिवारवाडा आणि मेट्रो स्टेशन यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांमुळे दिवसभर मोठी वर्दळ असते. अशा अत्यंत गजबजलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृतदेह आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, आर्थिक कारण किंवा इतर कोणता घातपाताचा हेतू आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न चर्चेत आला असून, शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज शहरात वाढणारी गुन्हेगारी, होणारे खून अत्याचार, आणि मारामारीच्या घटना याला आता पुणेकर त्रासले आहेत. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत असून तपासात काय बाबी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा