• Sun. Jun 14th, 2026
    Dharashiv Crime : युवकाला मध्यरात्री संपवलं, २०० मीटर फरपटत नेलं, कृष्णाथ यांच्या हत्येचं गूढ उलगडलं; बायकोनं कुणाच्या सहाय्याने काटा काढला?

    Dharashiv Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धाराशिव जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या हत्येचा अखेर उलगडा झालेला आहे.

    धाराशिव मंगरुळ कृष्णाथ साठे मर्डर केस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील युवकाच्या हत्येप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात मयताची पत्नी, तिचा प्रियकर तसेच आणखी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून, गुन्ह्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. बुधवार १५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेत ३६ वर्षीय कृष्णाथ आनंद साठे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

    पूर्वनियोजित हत्येचा संशय

    तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून, मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय २८) आणि तिचा प्रियकर शुभम घाटोळे (वय २०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शुभम हा बाहेरगावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्य एक मदत गारास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ पार्थिव आढळल्यानंतरच ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. आरोपींनी डोक्यात दगडाने वार करून, हत्या करून, पुरावा नष्ट करण्यासाठी पार्थिव पुलाजवळ टाकल्याचंही स्पष्ट झालं आहे. पार्थिव काही अंतर फरपटत नेण्यात आल्याचंही उघड झालं आहे.
    Maharashtra TimesAhilyanagar News : चारा घेऊन घरी निघाला, पण वाटेत खड्ड्याने घात केला; बैलगाडी उलटून तरुण शेतकऱ्याचा दबून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास

    सुरुवातीला आरोपींनी गुन्हा नाकारला होता; मात्र गुन्हे शाखेच्या कडक चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय घोटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई वेगाने पूर्ण केली. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांच्या हालचाली, तसेच इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास सुरू आहे. आणखी काही आरोपी या गुन्ह्यात सहभागी आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी मंगरूळ येथील अनेक लोकांची चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे.
    Maharashtra TimesNashik TCS Case : टीसीएस कंपनी ‘डेलॉईट-ट्रायलीगल’मार्फत नाशिक प्रकरणाची सखोल चौकशी करणार, निदा खानबद्दलही मोठा खुलासा; अधिकृत निवेदनात काय सांगितलं?

    ‘गुन्हेगार कितीही चलाख असले, तरी…’

    या कारवाईतून ‘गुन्हेगार कितीही चलाख असले, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही’, हा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे. मंगरुळ हत्या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे उलगडे होण्याची शक्यता व्यक्त होत असून, संपूर्ण तालुक्याचं लक्ष या तपासाकडे लागलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा