Maharashtra Sugar Production: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने १५ एप्रिलपर्यंत देशातील साखरेच्या उत्पादनाची माहिती जाहीर केली आहे. साखर निर्मितीमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
राज्यात मागील वर्षीपेक्षा १८.५५ लाख टन साखरेचे यंदा अधिक उत्पादन झाले आहे. संपूर्ण देशाचा विचार करता यंदा वीस लाख टन साखरेचे जादा उत्पादन झाले असून देशात २७३.९० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन वाढले असले, तरी सरासरीच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याने साखर उद्योगासमोरील आर्थिक संकट कायम आहे.
Rohit Pawar | भाजपकडून २०२९ च्या निवडणुकीसाठी प्रचाराखाली मत पेरणी सुरू? रोहित पवार काय म्हणाले?
राज्यात एक नोव्हेंबर रोजी ऊसगाळप हंगामास सुरुवात झाली. राज्यात यंदा २१० साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप झाले. या सर्व कारखान्यांची धुराडी बंद झाल्याने राज्यातील ऊस गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत देशात ५४१, तर राज्यातील २१० साखर कारखान्यांनी ऊसगाळप हंगामात भाग घेतला. उत्तर प्रदेशमधील १२१ पैकी ११२ आणि कर्नाटकमधील ८१ कारखान्यांमध्ये ऊसगाळप पूर्ण झाले आहे. मागील वर्षी राज्यात २०० कारखान्यांमध्ये ऊस गाळप झाले होते. देशातील साखर उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत २० लाख टनांनी वाढ झाली आहे. देशात १५ एप्रिलपर्यंत २७३.९० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. मागील वर्षी २५४.३० लाख टन साखरेची निर्मिती झाली होती. उत्तर प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात ९९.२०, उत्तर प्रदेशमध्ये ८९.२० लाख टन आणि कर्नाटकमध्ये ४७.१५ लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. मागील वर्षी या तीनही राज्यात अनुक्रमे ८०.६५, ९०.९५ आणि ४०.४० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात सुमारे १२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. संपूर्ण देशाचा विचार करता ऊस उत्पादक राज्यांमध्ये केवळ उत्तर प्रदेश, हरियाणा, तमिळनाडू येथील काही कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू आहे.
Maharashtra Heat Stroke: सावधान! राज्यात दीड महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण; पारा आणखी वाढण्याची शक्यता
… तरच टिकते अर्थकारण
-राज्यातील यंदाचा गाळप हंगाम सरासरी फक्त ११० दिवसांचा होता.
-गेल्या वर्षीचा हंगाम सरासरी ८३ दिवसांचा होता.
-कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला, तरच त्याचे अर्थकारण टिकते.
-यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने संपूर्ण साखर उद्योगावर परिणामाची शक्यता.
Pune News: मध्यरात्री महामार्गावर दाम्पत्याला उतरवलं; कोल्हापूर ते पुणे ई-शिवाई बसचालकाचा उर्मटपणा, प्रकरण काय?
२०२३- २४ या आर्थिक वर्षात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. मागील वर्षी हे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. मागील वर्षीचा हंगाम सरासरी केवळ ८३ दिवसांचा होता. यंदा तो ११० दिवसांचा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन वाढले असले, तरी ते सरासरीच्या तुलनेत कमी आहे. – प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
