• Sun. Jul 5th, 2026

    कामगार व उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 16, 2026
    कामगार व उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईन – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : जागतिक पातळीवर सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विविध क्षेत्रातील कामगार व उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कामगार आयुक्तालय येथे 022 -26572925 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन सेवा कामगार आयुक्तालय, कामगार भवन, ब्लॉक – ई, सी-20, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे (पुर्व), मुंबई येथे सुरू असणार आहे. तसेच ही हेल्पलाईन सेवा 24 तास सुरू राहणार असून उद्योजक व कामगार यांनी त्यांच्या समस्यांबाबत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.

    0000

    निलेश तायडे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed