• Sun. Jul 5th, 2026

    वसई–विरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 16, 2026
    वसई–विरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. १६ : वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील बाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी. तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशा  सूचना ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता  राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या.

    एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या सभागृहात आयोजित वसई–विरार मनपा क्षेत्रातील वीज समस्यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे, आमदार विलास तरे ( दूरदृश्य प्रणालीद्वारे)  महापारेषणचे संचालक सतीश चव्हाण, महावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, तसेच महानिर्मिती, महापारेषण, महावितरणचे संबंधित अधिकारी आणि वसई–विरार महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

    राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, वसई विरार परिसरात सुरू असलेल्या विद्युत विषयक कामातील त्रुटीबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून  त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच फ्लाइंग स्क्वॉडचा प्रभावी वापर करून  याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

    बैठकीत आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे  यांनीही वसई विरार भागातील वीज समस्यांबाबत माहिती दिली.

    ००००००

    एकनाथ पोवार/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed