Radhakrishna Vikhe Patil On Ashok Kharat Case: दीपक केसरकरांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानकडे गेले होते, असा खुलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीला आलेले असताना मी त्यांच्यासोबत भोंदू अशोक खरातकडे गेलो होतो. शिंदे यांनी खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानकडे जावे, यासाठी दीपक केसरकर आग्रही होते. त्यामुळे मी शिंदे यांच्यासोबत तिथे गेलो होतो. काही गोष्टी अज्ञानातून घडल्या,’ असा खुलासा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (दि.१५) भाजप कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. ‘अशोक खरातचे कारनामे माहीत असूनही त्याच्याकडे जाण गंभीर आहे. परंतु, काही जण अज्ञानाने गेले असून, त्यात अनेक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांनी कोणावर आरोप केले असतील तर, त्यांनी त्याचा तपशील ‘एसआयटी’कडे द्यावा. यात ‘एसआयटी’ला निष्पक्षपणे काम करू द्यावे,’ असे विखे पाटील यांनी सांगितले.
Ashok Kharat Case: खरातचा पाय खोलात! पुत्रप्राप्तीच्या दाव्यातून अत्याचार, चौथ्या गुन्ह्यात पाच दिवस पोलिस कोठडी इंदिरानगर येथील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण गंभीर असून, यातही दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आयटी कंपन्यांसाठी आचारसंहिता तयार करण्याची गरज आहे. कंपनीचा यात कोणताही दोष नाही, कंपनी बंद करणे योग्य नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. Nashik Crime: नाशिकच्या कंपनीत तरुण-तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी आरोपी काय-काय करायचे? FIR मधून ‘मोडस ऑपरेंडी’ उघड, धागेदोरे उलगडले! माझे भविष्य लोक ठरवतात ‘इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आले, तर आधी त्याचे भविष्य बघावे लागेल. मी कोणाकडेही भविष्य बघायला जात नाही. माझे भविष्य लोक ठरवतात,’ असा टोलाही विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला. दमानिया यांच्याकडे भरपूर माहिती असेल. रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. मोठ्या पदावर असले तरी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा