Koradi Plant Accident: जखमी झालेल्यामध्ये चार कामगार हे महानिर्मितीचे आहे, तर चार कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. अपघात घडला त्यावेळी युनिट बंद होते.
महानिर्मितीच्या माहितीनुसार सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास हा अपघात औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या युनिट क्रमांक १० मध्ये घडला. अपघात घडला त्यावेळी युनिट बंद अवस्थेत होते. वीजनिर्मितीनंतर उरलेली राख काढण्याचे काम सुरू होते. सुमारे १३ मीटर उंचीच्या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने ही प्रक्रिया सुरू होती. यावेळी बॉयलरच्या पीप होलमधून अचानक वाफ बाहेर पडली आणि तेथे काम करणारे आठ कामगार जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनवणे, ए. के. काझी, निखिल जयतगुडे, कमलेश बर्मटे, गुलाबसिंग टिकाम आणि विलास बन्सोड अशी जखमींची नावे आहेत.
Crime News : दोन शॅम्पूच्या बाटलीत निघाले 50 कॅप्सूल, किंमत तब्बल 4 कोटी 26 लाख, नागपुरात DRI ची मोठी कारवाई
सर्व जखमींना तत्काळ नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार जखमींची प्रकृती स्थिर असून पाटील, जयतगुडे, बर्मटे आणि टिकाम यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापूर्वीही ११ मार्चला याच केंद्रात ही घटना घडली होती. यात टर्बाईनमध्ये गळती होऊन चार कामगार जखमी झाले होते. त्यानंतर महिनाभरात पुन्हा एकदा याप्रकारची घटना घडल्याने वीजनिर्मिती केंद्रातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली
सुरक्षा तपासणीची गरज
घटनेनंतर महानिर्मितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आल्याचे सांगितले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून प्राथमिक तपासात कोणत्याही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महाजनको उचलणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे . मात्र, सलग घडणाऱ्या स्टीम गळतीच्या घटनांमुळे केंद्रात स्वतंत्र आणि सखोल सुरक्षा तपासणीची गरज असल्याची मागणी होत आहे.
