Amravati Obscene Video Viral : संशयित आरोपीने युवतींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वत:च चित्रित केले असून ते व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक युवतींचे लैंगिक शोषण केल्याची घटना सोमवारी समोर आली. विशेष म्हणजे, या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भाजपने सुमारे १८० हून अधिक मुलींचे साडेतीनशे व्हिडिओ असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील खरात प्रकरण गाजत असतानाच हा नवा प्रकार आल्याने संताप व्यक्त होत आहे.
ब्लॅकमेल करुन शरीरसंबंधांचे व्हिडिओ
या घटनेतील संशयित आरोपीने युवतींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वत:च चित्रित केले होते. हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणींची असहायता स्पष्टपणे दिसून येत असल्याने ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्याने अनेकींचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात केवळ एकच आरोपी नसून, त्याचे काही साथीदारही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Mumbai Crime : गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस, मुंबईतील दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जणांना अटक
आरोपी कुटुंबासह घरातून पसार
हे पाशवी कृत्य चव्हाट्यावर येताच संशयित आरोपी कुटुंबासह घरातून पसार झाला आहे. सध्या त्याच्या घराला कुलूप असून, पोलिसांसमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अद्याप कोणतीही पीडिता समोर आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओ हाच पुरावा मानून पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Supriya Sule | अजितदादांचं स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करणार?, सुळे म्हणाल्या, आनंद आणि स्वागत
परतवाडा प्रकरणाबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी निवेदनात महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन युवकांवर गंभीर आरोप केले असून, त्याआधारे पोलिसांनी तातडीने चौकशी चक्रे फिरवली आहेत. सध्या दोन्ही संशयित आरोपींचा शोध सुरू असून, ते ताब्यात आल्यानंतर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट
‘या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असल्यास पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे दाद मागावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सामाजिक सलोखा राखावा,’ असे आवाहन अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. Ratnagiri Crime : ‘हापूस ॲग्रो’च्या संचालकाने राहत्या घरी आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ, पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये त्यांचे चित्रीकरण केले जाते. यातील अनेक मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट रचला जात असून, विरोध करणाऱ्या मुलींना व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा