• Fri. Jun 5th, 2026
    Ladki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी आमिषाला बळी पडू नका! लाडक्या बहिणींना मंत्री अदिती तटकरेंचे आवाहन

    Ladki Bahin Yojana: महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे.

    लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ईकेवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. दरम्यान, जळगाव प्रकरणात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी रविवारी स्पष्ट केले आहे.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ई केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ई- केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

    भाजपकडून करेक्ट कार्यक्रम, पुढच्या महिन्यात शिवसेनेचा गेम? रोहित पवारांचा शिंदेंना सल्ला

    काही दिवसांपूर्वी जळगाव येथील ई-केवायसीच्या नावावर एका लाभार्थी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचे प्रकार समोर आले असून , याप्रकरणी जळगावच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाला आहे. लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर, ई केवायसी करून देतो असे सांगून काहीजण महिलांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

    Maharashtra TimesMarathi Language: मराठी येत नसेल तर रिक्षाचालकांचं लायसन्स होणार रद्द; 1 मेपासून थेट कारवाई, परिवहनमंत्र्यांची माहिती
    आठ तासांत अर्ज मंजूर
    मुंबई : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी लवकरच नवी अद्ययावत प्रणाली सुरू केली जाणार आहे. या नव्या प्रणाली अंतर्गत या योजनेतील प्राप्त अर्जांवर मंजुरीसाठी केवळ आठ तासांत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी रविवारी दिली. लवकरच या नव्या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असल्याची माहितीही नाईक यांनी यावेळी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा