• Sun. Jun 7th, 2026
    Tiger Death Cases: देशाने गमावले 50 वाघ; साडेतीन महिन्यांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 18 तर महाराष्ट्रात 10 मृत्यू

    Tiger Death Cases: मागील वर्षातील डिसेंबरपासून देशभरातील २२ राज्यांतील जंगलात व्याघ्रगणना मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम २०२६च्या वर्षाअखेरीसपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

    tiger death in maharashtra(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पंकज मोहरीर, चंद्रपूर: वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच अग्रस्थानी असताना मागील साडेतीन महिन्यात देशाने ५० वाघ गमावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० टक्के वाघांच्या मृत्यूचा समावेश आहे.

    पृथ्वीतलावरून वाघांच्या प्रजाती झपाट्याने लुप्त होत आहे. भारतात त्याला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गांभीर्यपूर्ण प्रयत्न होताना दिसत आहेत. परिणामी एकेकाळी देशात संकटग्रस्त ठरू पाहणारी वाघांची प्रजाती आणि आता वाढत असलेली वाघांची संख्या हे आशादायी चित्र २०२२च्या व्याघ्रगणनेत दिसून आले. पण चालू वर्षातील जानेवारी २०२६ ते आतापर्यंत या साडेतीन महिन्यांत देशाने ५० वाघ गमावले आहेत. त्यातील मृत्यू हे वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकारीत, वा नैसर्गिकरीत्या अशा विविध कारणांनी झाले आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशात सर्वाधिक १८, महाराष्ट्रात १० वाघांचा मृत्यू झाला आहे.

    Maharashtra TimesNashik Crime: तोंड झाकून महिला घरी आली, उकळतं तेल 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर फेकलं; स्कार्फ काढताच सर्वांनाच धक्का
    वाघांच्या शिकारीविरोधात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तरच्या दशकात आवाज उठवला गेला. भारतातील वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणवादी संस्थानी पहिल्यांदा एकत्र येऊन वाघांच्या शिकारीविरोधात ओरड सुरू केली. त्यानंतर सरकारने पावले उचलण्यास प्रारंभ केला. परिणामी शिकारीच्या घटनेत मागील काही वर्षांत घट झाली. पण शिकारीच्या घटना सुरूच असल्याने तो चिंतेचा विषय मानला जात आहे.

    रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातांमुळे वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांत देखील अलीकडे मोठी वाढ झाली आहे. राज्यातील विविध जंगलात रस्ते अपघातात मागील काही वर्षात वाघ, बिबटसह मोठ्या संख्येने वन्यजीवांचा नाहक बळी गेला आहे. परिणामी वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

    Maharashtra TimesSatara Crime: अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं, साताऱ्यातील मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं
    व्याघ्र प्रकल्पाबाहेर सुरक्षा महत्त्वाची
    व्याघ्र प्रकल्पात सुरक्षा असल्याने शिकारी तेथे प्रयत्न करत नाहीत. पण त्यांचा डोळा नेहमी व्याघ्र प्रकल्पाबाहेर असणाऱ्या वाघांकडे असतो. तब्बल ३४.६६ टक्के वाघ प्रकल्पाबाहेर असल्याने त्यांची सुरक्षा होणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

    राज्यनिहाय व्याघ्रमृत्यूची संख्या
    राज्य –मृत्यूसंख्या

    मध्य प्रदेश १८
    महाराष्ट्र १०
    कर्नाटक ५
    तमिळनाडू ४
    आसाम ४
    उत्तर प्रदेश २
    छत्तीसगड २
    उत्तराखंड १
    तेलंगण १
    राजस्थान १
    अरुणाचल प्रदेश १
    ओडिशा १

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा