• Sun. Jun 7th, 2026
    Sunetra Pawar : ‘सेवा करता करता दादा गेले, त्यांची स्वप्नं आता पूर्ण करायचीत’; बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्रा पवार भावुक

    सध्या बारामती पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

    ‘सेवा करता करता दादा गेले, त्यांची स्वप्नं आता पूर्ण करायचीत’; बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्रा पवार भावुक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. “सेवा करता करता दादा गेले, त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” असे सांगताना त्या भावूक झाल्या. बारामतीचा पाणी प्रश्न सोडवून शाश्वत विकास करण्याची ग्वाही देत, त्यांनी या ऐतिहासिक निवडणुकीत मतदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.

    फडणवीस -शिंदेंचे आभार मानले

    यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. दादांच्या निधनानंतर अजूनही आपण सावरत आहोत, असे सांगताना त्या भावूक झाल्या. “सेवा करता करता दादा गेले, त्यांचा जनसेवेचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली असेल,” असे त्या म्हणाल्या.

    “दादा नसतानाची ही पहिली निवडणूक..”

    बारामतीतील ही निवडणूक केवळ पोटनिवडणूक नसून ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे सांगत, “दादा नसतानाची ही पहिली निवडणूक आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या पाठबळाचा विशेष उल्लेख करत, बारामतीच्या विकासासाठी जिरायत भाग बागायती करण्याचे, पाणी प्रश्न सोडवण्याचे आणि ३३ गावांच्या विकासाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.Maharashtra TimesMumbai Local : सुट्टीच्या दिवशीच मुंबई लोकलचा खोळंबा; तासभरानंतरही ट्रेन निघत नसल्याने प्रवाशांचा ट्रॅकवरुन मार्ग, नेमकं काय घडलं?

    “दादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करू,”

    शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत सर्वसमावेशक विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करत, “प्रत्येक मताचा आदर करून दादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करू,” असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही देत, त्यांनी बारामतीकरांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.

    दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. जय पवार यांनी मारुतीरायाला नारळ वाढवला. यावेळी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. यावेळी आता मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. याशिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कण्हेरी येथील प्रचाराच्या शुभारंभ सभेसाठी रवाना होण्यापूर्वी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासमवेत युवानेते जय पवार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा