Local Train Update : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली असून भाईंदर ते नायगाव दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. विरारकडे जाणारी वाहतूक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल होत असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मुंबई लोकल अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल रेल्वे कधी तांत्रिक कारणास्तव दगा देईल, याचा आता नेम उरलेला नाही. रविवार म्हटलं की प्रवाशांची गर्दी कमी असते, पण आज सुट्टीच्या दिवशीच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. भाईंदर आणि नायगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. ऐन सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांपासून ते फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा पुरता खोळंबा झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७:५० च्या सुमारास भाईंदर आणि नायगाव दरम्यान डाऊन थ्रू मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. एका प्रवाशाने सांगितले की, ट्रेन पुलाजवळ आली असतानाच अचानक मोठा आवाज झाला आणि गाडी जागच्या जागी खिळली. या बिघाडामुळे केवळ लोकलच नाही, इतर मेमू गाड्यांचाही खोळंबा झाला. या सर्वाचा परिणाम म्हणजे विरारच्या दिशेने जाणारी जलद आणि धीम्या अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक तब्बव ४० ते ४५ मिनिटे उशिराने धावत आहे.
प्रवाशांची पायपीट
ट्रेन कधी सुरू होणार याची कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांचा संयम सुटला. भर उन्हात ट्रेनमध्ये बसून राहण्यापेक्षा शेकडो प्रवाशांनी रुळांवर उतरून चालण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रवाशांची ही पायपीट स्पष्टपणे दिसत आहे. एसी लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांचे तर उकाड्यामुळे प्रचंड हाल झाले.
Pune Crime : पुण्यात शाळकरी मुलीचा 55 वर्षीय रिक्षाचालकाने केला विनयभंग, पोलिसांकडून तत्काळ कारवाई; पोक्सो दाखल, आरोपीला अटक
रेल्वेकडून मेमू ट्रेन रद्द
घटनेची माहिती मिळताच वसई रोड येथून तांत्रिक पथक आणि टॉवर वॅगन घटनास्थळी रवाना करण्यात आली. मात्र, दुरुस्तीच्या कामामुळे बोरीवली-वलसाड मेमू ट्रेन (६९१३९) ही वसई रोड आणि वलसाड दरम्यान रद्द करण्यात आली. अडकलेल्या गाड्यांना बाहेर काढण्यासाठी डिझेल इंजिनची मदत घ्यावी लागली.
रेल्वे प्रशासनाने या गोंधळाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबईकरांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचे चित्र आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असली, तरी सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी कायम आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा