• Wed. Jun 17th, 2026

    Mumbai Metro 5: भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

    Mumbai Metro 5: भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

    Thane-Bhiwandi Metro: ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडीदरम्यान काम सुरू आहे. वर्षाअखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून 2027पर्यंत नागरिकांसाठी मेट्रो सुरू होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर ठाणे शहरात धावणाऱ्या आणखी एका मेट्रोच्या कामांना वेग मिळाला आहे. ठाणे आणि भिवंडीदरम्यान मेट्रो लाइन 5 (ऑरेंज लाइन)चं काम कित्येक वर्ष सुरूच आहे. अखेर या मेट्रोसाठी एक नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. या डेडलाइननुसार ठाणे-भिवंडी मेट्रो येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होऊन जानेवारी 2027पर्यंत प्रवाशांसाठी खुली करणार असल्याची शक्यता आहे.

    दहिसर-काशीगाव मेट्रोमुळे दिलासा

    काही दिवसांपूर्वीच दहिसर-काशीगाव मेट्रोचं लोकार्पण पूर्ण झालं. ठाणे शहर आणि हार्बर लाइनवरून धावणारी ही पहिलीच मेट्रो आहे. पहिल्या दिवसापासूनच मेट्रोला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. काशीगाव मेट्रो स्थानकावर सायंकाळी तर प्रवाशांचा रांगा दिसून आल्या. यामुळे ठाणे शहरात मेट्रोची गरज किती आहे हे स्पष्ट दिसून आले. सध्या ठाणे ते भिवंडी प्रवास करणाऱ्यांना बसचा वापर करावा लागतो. या बस कधी-कधी आर्धा तासाच्या विलंबाने दाखल होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तसेच, सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे बसमध्ये प्रवाशांना तासांतास घालवावे लागतात. दरम्यान, ट्रेनने जाण्यासाठी प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकावरून मेमू गाडीने प्रवास करावा लागतो. या रेल्वे गाड्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष नागरिकांकडून थेट ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी केली जात आहे.Maharashtra TimesMumbai Local: धावत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास आता होणार बंद, दरवाजे बंद होणारी लोकल झाली सज्ज; मुंबईकडे रवाना

    कसा असेल मार्ग?

    मेट्रो लाइन 5 ही ठाणे-भिवंडी-कल्याण जोडणारी 25 किमी लांब मार्गिका असेल. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी मार्गिकेचं काम पूर्ण केलं जाणार असून हे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांनी दिलेल्या माहितीनुसार या मेट्रोसाठी ग्राऊंडवर्क आणि सर्व तांत्रिक कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. गुरूवारी भिवंडी महानागरपालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो अधिकाऱ्यांनी या कामांची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी हे काम डिसेंबर 2026पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

    ठाण्यासह मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही भिवंडीवरून थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे दररोज प्रवाशांना ठाणे आणि कल्याणमार्गे बसने प्रवास करून मुंबई गाठावी लागते. मेट्रो लाइन 5 सुरू होताच भिवंडीतील नागरिकांना दिलासा मिळणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

    Maharashtra TimesMumbai Metro : मेट्रोचा प्रवास आता होणार स्वस्त; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी तिकिटांमध्ये 25 टक्के सवलत, काय आहे ही ऑफर?

    2017मध्ये मान्यता

    मेट्रो लाइन 5 या प्रकल्पाला 2017मध्ये एमएमआरडीएने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर 2020मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाली. पण आता 6 वर्ष उलटून गेले असले तरी अजून काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पण आता पहिल्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असली तरी दुसऱ्या म्हणजे कल्याणपर्यंत टप्प्याचं काम अजून सुरूही झालेलं नाही. त्यामुळे, संपूर्ण मेट्रो लाइन 5 सुरू होण्यासाठी नागरिकांना आणखी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा