Maharashtra Government News: साड्या प्राप्त झाल्यानंतर तातडीने वितरण सुरू करण्यात येईल. ग्रामीण भागात ८२ हजार १०४ महिलांना साड्यांचे वितरण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारचं आणखी एक गिफ्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, नागपूर शहरात या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. शहर पुरवठा विभागाने परिमंडळनिहाय साड्यांचे नियोजन निश्चित केले असून, एकूण ४६ हजार १५० साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश अंत्योदय कुटुंबांना दिलासा देणे तसेच वस्त्रोद्योगाला चालना देणे हा आहे.
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाला या योजनेसाठी नोडल संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करून ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या गोदामांपर्यंत पोहोचवले जातील. त्यानंतर रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना साड्या वितरित केल्या जातील. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साड्यांचे वितरण जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. महिन्याच्या अखेरपर्यंत साड्या मिळणे अपेक्षित आहे.
‘ई पॉस’द्वारे वितरण प्रशासनाने साड्यांची नोंदणी व वितरण प्रक्रिया ‘ई-पॉस’ यंत्राद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लाभार्थ्यांची नोंद ऑनलाइन प्रणालीवर करणे बंधनकारक राहणार आहे. एका गठ्ठ्यात १०० साड्या असून त्याचे वजन अंदाजे ४२ ते ४६ किलो दरम्यान असणार आहे. साड्यांचे साठवण, हाताळणी आणि वितरण याची जबाबदारी संबंधित परिमंडळ कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. साड्यांची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी वाहतूक व साठवणुकीदरम्यान विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत फाटलेल्या किंवा खराब साड्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परिमंडळ : वितरित होणाऱ्या साड्या धंतोली : ४ हजार ५८८ मेडिकल : ६ हजार ७८८ महाल : ८ हजार ३८७ इतवारी : ११ हजार ७६७ सदर : ५ हजार ५१८ टेका : ९ हजार १२२
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा