Chhatrapati Sambhajinagar news Police Recruitment Nitin Chaure : सध्या राज्यात पोलीस भरती सुरु आहे. त्यासाठी रणरणत्या उन्हात मैदानी परीक्षा द्यावी लागत आहे. संभाजीनगरच्या एका तरुणाकडे धावायला बूटही नव्हते.
संभाजीनगर पोलीस भरती नितीन चौरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नशिबापेक्षा कष्टावर विश्वास ठेवला की यशाचे दरवाजे आपोआप उघडतात, याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमधील राज्य राखीव पोलीस बल मैदानावर आला. अकोल्याहून भरतीसाठी आलेल्या नितीन चौरे या तरुणाने गरिबीचे चटके सोसत, पायात साधी सँडल घालून ५ किलोमीटरची धाव अवघ्या १८ मिनिटांत पूर्ण केली. त्याची ही अभूतपूर्व चिकाटी पाहून उपस्थित वरिष्ठ अधिकारी देखील भारावून गेले.
नितीनच्या डोळ्यात आनंदाश्रू
नितीनची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पोलीस भरतीसाठी सराव करताना आणि प्रत्यक्ष चाचणीला येताना त्याच्याकडे पायात घालायला चांगले बूटही नव्हते. मात्र, मनात खाकी वर्दीचे स्वप्न असल्याने त्याने परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाहीत. त्याने आपल्या पायातील सँडलवरच सराव केला आणि प्रत्यक्ष मैदानावर जेव्हा ५ किलोमीटर धावण्याची वेळ आली, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का देत हे कठीण अंतर आउट ऑफ वेळेत पूर्ण केले. मैदानावर सँडल घालून धावणाऱ्या या जिद्दी तरुणावर एसआरपीएफचे एसपी विक्रम साळी यांची नजर पडली. नितीनची मेहनत आणि त्याची परिस्थिती पाहून साळी सरांचे मन हेलावले. त्यांनी तत्काळ नितीनला जवळ बोलावले आणि त्याला नवीन बूटांची जोडी भेट दिली. केवळ शाबासकी देऊन न थांबता, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या या मदतीमुळे नितीनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
सोशल मीडियावर ६० लाखांहून अधिक प्रेक्षक
या घटनेचा व्हिडिओ ‘SRPF Gr. 14’ च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, ६० लाखांपेक्षा जास्त लोकांनी नितीनच्या संघर्षाला सलाम केला आहे. वर्दी मिळवण्यासाठी एका तरुणाने दिलेली झुंज आणि एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवलेली माणुसकी, यामुळे हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Beed Crime : प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनं पोटच्या गोळ्याला पुण्यात संपवलं, माहेरी जाताच आजोबांमुळे घटनेचा पर्दाफाश; बीडमध्ये काय घडलं?
आता स्वप्न पूर्ण करणारच नितीनचा निर्धार
‘माझ्याकडे बूट नव्हते म्हणून मी सँडलवरच धावलो. साळी साहेबांनी माझी जिद्द ओळखली आणि मला बुट दिले, मी त्यांचा खूप आभारी आहे. आता अधिक जोमाने मेहनत करून मी पोलीस होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन’, अशा शब्दांत नितीन चौरेने आपले आभार व्यक्त केले आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा