• Sat. Jun 13th, 2026
    Crime News : पेट्रोल पंपावर भरदिवसा महिलेला संपवलं, छ.संभाजीनगरमधील पूजा गवांडे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; धक्कादायक कारण समोर

    Chhatrapati Sambhajinagar Crime : पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले त्यानंतर तो तिथून पसार झाला.अतिरक्तस्त्रावामुळे पूजा गावंडेचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    करमाड इंडियन पेट्रोल पंप पूजा गवांडे हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास रक्ताचा सडा पडला. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पंपावर राबणाऱ्या पूजा गवांडे या महिलेची तिचाच दुसरा पती सत्यम गवांडे याने अमानुषपणे हत्या केली. एका बाजूला लग्नानंतर विभक्त राहणारे पती-पत्नी आणि दुसऱ्या बाजूला घटस्फोटासाठी असणारा अट्टाहास, या वादाचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला.

    तिसरे लग्न करण्याची इच्छा

    या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पूजा यांचा हा दुसरा संसार होता. पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी सत्यमसोबत आळंदीत लग्नाची गाठ बांधली होती. पूजा यांना पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहेत. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच या नात्यात दुरावा आला. सत्यमला आता तिसरे लग्न करायचे होते, त्यासाठी तो पूजाकडे घटस्फोटासाठी सतत तगादा लावत होता. मात्र, पूजाने समाजाचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून साथ सोडण्यास नकार दिला.
    Maharashtra TimesRatnagiri Crime : पांडुरंग अन् भारत सरकार लिहिलेली कार, व्यावसायिकाला घाटात पकडलं; कारमध्ये कोंबून आंबा घाटात मध्यरात्री थरारक दरोडा

    डोक्यात सूडाचे चक्र सुरू

    घटस्फोटाला नकार मिळत असल्याने सत्यमच्या डोक्यात सूडाचे चक्र सुरू होते. आज गुरुवारी पूजा पेट्रोल पंपावर आपल्या कामात व्यस्त असताना सत्यम तिथे पोहोचला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि सत्यमने जवळ असलेला धारदार चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर भीषण वार केले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक सुन्न झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांचा जागीच प्राण गेला.

    नेमकं काय घडलं?

    चित्तेपिंपळगाव इथं राहणारी पूजा सुदाम गावंडे ही तरुणी करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर आपली ड्युटी करत होती. दुपारी १२:३० च्या सुमारास, जेव्हा महामार्गावर मोठी वर्दळ असते, तेव्हा आरोपीने अचानक पूजावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच प्राण गेला.
    Maharashtra TimesAshok Kharat: खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार, काळ्या कारनाम्याचा भांडाफोड
    घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा करमाड पोलिसांनी अत्यंत वेगाने शोध घेतला. तांत्रिक माहिती आणि खबर मिळताच पोलिसांनी अवघ्या ६० मिनिटांच्या आत सत्यम गवांडे याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि त्यामागचे सविस्तर कारण याचा तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा