पार्थ पवार यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. राज्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांना खासदारकीची शपथ दिली. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी गुलाबी जॅकेट परिधान केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या शपथविधीचा व्हिडीओ पाहताना अनेकांना अजित पवार यांची आठवण येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार हे सर्वसामान्यांचे नेते होते. ते पहाटे लवकर उठून कामाला लागायचे. ते अतिशय शिस्तप्रिय होते. त्यामुळे त्यांचा प्रशासनात वचक होता. प्रशासकीय कामकाजात कुठेही त्रुटी असेल आणि ती अजित पवार यांच्या लक्षात आली तर ते अधिकाऱ्याला सर्वांसमोर झापायचे. त्यामुळे अधिकारी वर्ग देखील फार काटेकोरपणे आपापली कामे चोख पार पाडायचा प्रयत्न करायची. अजित पवार हे एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर गेले तर ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते भेटायचे. त्यांची समस्या जाणून घ्यायचे. तसेच अनेकदा ते जागेवर अनेकांची कामे सोडवायचे. त्यामुळे अजित पवार हे खूप लोकप्रिय झाले.
अजित पवार जिथे जात तिथे त्यांचं वलय ठळकपणाने दिसून यायचं. पण दुर्दैवाने विमान अपघातात त्यांचं निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. त्यामुळे पवार कुटुंबासाठी आज भावनिक क्षण होता. कारण अजित पवार यांच्या निधननंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे आज पहिल्यांदा संसद भवनची पायरी चढले. अजित पवार यांच्या निधननंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राज्यसभेवर पार्थ पवार यांची बिनविरोध निवड झाली.
पार्थ पवार यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांना शपथ दिली. पार्थ पवार यांच्या शपथविधीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पार्थ पवार इंग्रजीत शपथ घेताना दिसत आहेत. या शपथविधीवेळी पार्थ पवार यांचा पेहराव पाहून अनेक जण भावूक होत आहेत. पार्थ पवार यांच्या रुपाने जणू अजित दादा आहेत, असा भास अनेकांना होतोय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर अजित पवार गुलाबी जॅकेट परिधान करुन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्यांच्या गुलाबी जॅकेटची चांगलीच चर्चा व्हायची. अजित दादा यांच्यासारखा अगदी तंतोतंत पेहराव परिधान करुन पार्थ पवार यांनी आज खासदारकीची शपथ घेतली.
विशेष म्हणजे शपथविधीसाठी दालनात उपरराष्ट्रपती दाखल झाले तेव्हा सर्वजण आपापल्या जागेवरुन उभे राहिले. पार्थ पवार हे सुद्धा शांतपणे आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी उपराष्ट्रपतींना नमस्कार केला. पार्थ पवार यांच्या बाजूला सुनेत्रा पवार या देखील होत्या. तसेच खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच पार्थ पवार यांच्या पाठिमागे राज्याचे माजी मंत्री अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.
शपथविधीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा पार्थ पवार अतिशय शांतपणे आणि संयमाने जागेवरुन उठले. त्यांनी अतिशय शांत आणि नम्रपणे इंग्रजीत खासदारकीची शपथ घेतली. यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. यानंतर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपतींनी पार्थ पवार यांना वडील अजित पवार यांचा वारसा पुढे नेण्याच्या शुभेच्छा दिल्या. अतिशय शांत आणि भावनिक वातावरण यावेळी झालेलं बघायला मिळालं. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शपथविधीनंतर पार्थ पवार यांची पहिली प्रतिक्रिया
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ मान्यवर नेते उपस्थित होते. जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात ठेवून राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा, जनतेची बाजू मांडण्याचा व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन”, अशी पहिली प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी शपथविधीनंतर दिली.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
“राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. श्री. पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा