• Sun. Jun 14th, 2026

    Nashik News : नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग आणि अत्याचार; 8 पीडितांची तक्रार, 9 गुन्हे दाखल

    Nashik News : नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग आणि अत्याचार; 8 पीडितांची तक्रार, 9 गुन्हे दाखल

    नाशिकमध्ये अशोक खरात आणि रवींद्र एरंडे या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना आता एका खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिलांचे लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 8 पीडित महिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असताना आता नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत 6 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिलांचा गेल्या काही 2 वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक छळ सुरू होता. अखेर पीडित महिलांनी तक्रार केल्यानंतर या प्रकाराची भीषणता समोर आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी या तपासासाठी SIT स्थापन केली आहे आहे.

    या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना सदर ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन देखील शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. ज्यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक ९९२३३२३३११ वर मेसेज पाठवू शकतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

    कोर्टात काय-काय घडलं?

    एकूण ८ पीडित महिला यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. तर एका पुरुषाने देखील दिलेल्या तक्रारीहून 1 गुन्हा असे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तार असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी यांचे नाव आहेत. आठ दिवसांपूर्वी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनतर आज दुसऱ्या गुन्ह्या संदर्भात 5 संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    सरकारी वकिलांकडून आज सुनावणी दरम्यान युक्तीवाद करण्यात आला की, या प्रकरणाचा आणखी तपास करणे बाकी असून, आणखी काही महिलांच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आरोपींच्या वकिलांनी “या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला आहे. महिलांनी इतक्या महिन्यानंतर तक्रार का दाखल केल्या? अधिकची पोलिस कोठडीची गरज नाही”, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    या प्रकरणात आता शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष SIT पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली या SIT ची स्थापना करण्यात आली आहे. पुढे तपासात काय-काय बाबी समोर येतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा