• Sat. Jun 6th, 2026
    माझे आणि मैत्रिणींचे कपडे न घातलेले फोटो-व्हिडिओ ‘टॅब’मध्ये, भोंदू रवींद्र एरंडेचा निर्लज्ज जबाब

    Ravindra Erande : भोंदू अशोक खरातप्रमाणेच संशयित रवींद्र एरंडे यानेही महिलांना विविध स्वरूपाचे आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचे उघड झालेय

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हस्तरेषातज्ज्ञ असल्याचे भासवून भोंदूगिरी करणाऱ्या संशयित रवींद्र एरंडे याने त्याच्या ‘टॅब’मध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक दावा केला. ‘माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ आहेत’, असे एरंडेने पोलिसांना सांगितले असून, त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो, व्हिडीओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करीत होता का, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत.

    काय आहे प्रकरण?

    भोंदू अशोक खरातप्रमाणेच संशयित रवींद्र एरंडे यानेही महिलांना विविध स्वरूपाचे आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचे उघड झाले आहे. एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी जप्त केली. आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या रवींद्र एरंडेचे लैंगिक अत्याचाराचे बिंग त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले. सातपूर पोलिसांनी संशयित एरंडेला अत्याचारासह ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक केली. एरंडेच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वाढ केली.
    Maharashtra TimesHit and Run : जिथे पोलीस हरले, तिथे आई जिंकली; 18 वर्षांच्या क्षितीजचा हिट अँड रनमध्ये मृत्यू, पोलिसांनी केस बंद केली, 18 महिने माऊलीची शिकस्त, अखेर पुरावे मिळवलेच

    ऑफिस बॉयमुळे पर्दाफाश

    ‘ऑफिस बॉय’ने मालकाच्या गैरकृत्यांचा भांडाफोड करून बारा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. एरंडेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीखोरांना अटक केली होती. या फिर्यादीमध्येच एरंडेने स्वतःचे गैरकृत्य एकप्रकारे मान्य केले आहे. कारण, खंडणीच्या फिर्यादीत ‘मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असा डाटा एका टॅबमध्ये सेव्ह करून तो ऑफिसमध्येच ठेवला होता’, असा उल्लेख एरंडेने केला. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या ‘डीव्हीडी’मध्ये त्याचेच शंभर आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सापडले.

    Trupti Desai | खरात सीडीआर रिपोर्टवरून दमानियांच्या चौकशीची मागणी, तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

    Maharashtra TimesKandivali Accident : शाळेत जाणाऱ्या चिमुरडीला भरधाव डम्परने चिरडलं, जागीच मृत्यू, कांदिवलीकरांनी वाहतूक रोखून धरली

    जादूटोण्याची भीती

    संशयित रवींद्र एरंडे हा अघोरी अमानुष प्रकारांसाठी विविध वन्यजीवांच्या अवयवांची, जादूटोण्याची भीती दाखवून तसेच गरजूंना नोकरी, व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवून, वेगवेगळ्या प्रकारचे शोषण करीत असल्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला शंका आहे. त्यांनी याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले. एरंडेची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत. यासह त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘अंनिस’ने केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा