• Sun. Jun 7th, 2026
    Ashok Kharat Case: पीडितांचे व्हिडिओ जाहीर होणे गंभीर; खरातप्रकरणी वर्षा गायकवाड यांची कारवाईची मागणी

    Varsha Gaikwad On Ashok Kharat Case: पीडितांचे व्हिडिओ जाहीर होणे हे आक्षेपार्ह अन् गंभीर आहे. अशोक खरातप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

    अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, खरात प्रकरणात स्थानिक पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारत येत नाही. या प्रकरणातील महिलांचे व्हिडिओ सार्वजनिक होणे हे आक्षेपार्ह असून, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी सोमवारी मुंबईत केली.

    ‘अशोक खरातशी कोणते मंत्री व नेते किती वेळ बोलले, याचा सीडीआर बाहेर आला आहे. हा सीडीआर खासगी व्यक्तीला कसा काय मिळाला व त्यातील काही लोकांचीच नावे कशी काय जाहीर केली, यामागे राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार दिसत आहे. सीडीआर बाहेर कसा आला, त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

    मुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी स्वपक्षातील आणि मित्रपक्षातील खरातशी संबंधित मंत्री व नेत्यांची चौकशी करत नाहीत का? असा प्रश्नही गायकवाड यांनी केला.

    Maharashtra TimesRahuri Politics: भाजपचा पवारांना धक्का! तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार, ‘राष्ट्रवादी’कडून गोविंद मोकाटे रिंगणात
    खरातप्रकरणी ‘ईडी’कडून गुन्हा
    दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्यवाणीच्या दाव्यातून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात अशोक खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात याच्याविरुद्धच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये मनी लाँड्रिंगचाही तपास केला जाईल, असे विधान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘ईडी’ने ही कारवाई केली. खरातवर केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे, तर आर्थिक गैरव्यवहार, बेकायदा जमीन बळकावणे आणि मालमत्तांचे अवैध व्यवहार केल्याचेही आरोप आहेत. काळ्या पैशातून या मालमत्ता खरेदी केल्या गेल्या आहेत का, याचा तपास आता ‘ईडी’ करणार आहे.

    ‘एसआयटी’ने तथ्य समोर आणावे- अंजली दामानिया
    ‘अजित पवार यांचा अपघात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच, २७जानेवारीला समता पतसंस्थेत १७, अपघाताच्या दिवशी म्हणजे २८ जानेवारीला १९, त्यानंतर पुढील तीन दिवस अनुक्रमे १०, आठ आणि आठ व्यवहार झाले. ते कुणी केले, खरातच्या खात्यात पैसे डिपॉझिट झाले की काढले गेले हे ‘एसआयटी’ ने शोधून काढावे’, अशी मागणी दामानिया यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा