• Thu. Aug 6th, 2026

    ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ; नवीन दहा ड्रोन खरेदी करा – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 7, 2026
    ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ; नवीन दहा ड्रोन खरेदी करा – मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मुंबई, दि.७ : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  दिले.

    मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्माण अधिनियम 1981 च्या कायद्याच्या अंमलबजावणी करिता गस्ती नौका व ड्रोन खरेदी याबाबतचा आढावा घेतला.  या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

    मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनद्वारे सर्वेक्षण महत्वाचे आहे. यामुळे यापूर्वी खरेदी केलेल्या नऊ ड्रोनद्वारे सर्वेक्षण काम  होत आहे.  या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी केल्यास हे काम अत्यंत  अचूकपणे होईल. त्यामुळे अतिरिक्त दहा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून ड्रोन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच गस्ती नौका खरेदीसाठीही तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

    ०००

    एकनाथ पोवार/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed