• Tue. Aug 25th, 2026
तुकाराम मुंढेंनी आईच्या स्मृती चिरकाल स्मरणात ठेवण्यासाठी उचललं अनोखं पाऊल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ज्या अधिकाऱ्यासमोर भ्रष्ट यंत्रणा थरथर कापते त्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचं एक अत्यंत हळवे रूप महाराष्ट्राने पाहिले. आईच्या पार्थिवासमोर जाताच त्यांचा संयम सुटला आणि भावाच्या गळ्यात पडून ते ढसाढसा रडले. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे नुकतेच निधन झाले.. त्यांच्या निधनानंतर मुंडे परिवाराने अस्थि विसर्जन पाण्यामध्ये न करता घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करून त्या ठिकाणी केले.. पर्यावरणाला कोणतीही हानी न होता आईच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहाव्यात याकरिता आम्ही हा निर्णय घेतल्याचे तुकाराम मुंडे यांनी सांगितले याबरोबरच आईच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी तुकाराम मुंढे यांचे भाऊ सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंडे हे देखील उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed