उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा केला आहे. घटनेच्या काही तासातच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या धरपकड दरम्यान एका आरोपीने पाठलाग करणाऱ्या पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर देत पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या पायावर गोळी झाडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमध्ये जे काही सध्या सुरु आहे ते बॉलिवूडच्या एखाद्या गुन्हेगारीशी संबंधित थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. नांदेडमध्ये सोमवारी (6 एप्रिल) पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात सोनू कल्याणकर यांचा मृत्यू झाला आहे. सोनू कल्याणकर यांचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी शोधून काढलं आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यापैकी चौथ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीनेच हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांच्या दिशेला गोळीबार केला. त्याला पोलिसांनी देखील प्रत्युत्तर दिलं. पोलिसांनी प्रत्युत्तर देत असताना आरोपीच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे आरोपी जखमी झाला. सध्या या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
पूर्व वैमन्यसातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातं आहे. रोहित लोट, प्रसाद शिंदे, अंकुश गंधमवाड आणि कृष्णा जोगदंड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सलग तीन दिवस घडलेल्या खुनाच्या घटनेने नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेला सोनू कल्याणकर या 35 वर्षीय तरुणाचा आज सकाळी चार जणांनी खंजरने अनेक वार करून निर्घृणपणे खून केला. मॉर्निंगवॉकसाठी गेला असता श्रीनगर भागात आरोपीने त्याच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेल्या कल्याणकर याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरु केली. सुरुवातीला पोलिसांनी रोहित लोट, प्रसाद शिंदे आणि कृष्णा जोगदंड याला ताब्यात घेतले. अंकुश गंधमवार हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झरी येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांचे पथक त्याचा पाठलाग करत असताना आरोपी गंधमवाड याने पोलिसांवर पिस्तूलने गोळीबार करण्याच्या प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आपल्या जवळील रिव्हॉल्वरमधून त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी केले.
सोनू कल्याणकर यांच्यावर चार वर्षापूर्वीही झालेला हल्ल्याचा प्रयत्न
आरोपी अंकुश गंधमवाड याला रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली का इतर कारण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. धक्कादायक म्हणजे मयतावर चार वर्षापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्यात तो थोडक्यात बचावला. गोळीबार करणारा आरोपी सध्या जेलमध्ये आहे. त्याने हे कांड घडवलं असावं, असा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केलं जात आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा