• Sun. Jun 14th, 2026

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरीकरणाच्या मार्गावर, वाहतूककोंडीला दिलासा; मात्र टोल वसुलीचा कालावधी वाढणार

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरीकरणाच्या मार्गावर, वाहतूककोंडीला दिलासा; मात्र टोल वसुलीचा कालावधी वाढणार

    Mumbai-Pune Expressway Toll: दररोज मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या एकूण 65,000 आहे. हीच संख्या वीकेंड किंवा सणाच्या वेळी एक लाखाच्या वर जाते. त्यामुळे नागरिकांना या 10 रुंदीकरणाचा फायदा होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील प्रवासी वाहतूककोंडीमुळे त्रस्त आहेत. वीकेंडला तर गाड्यांच्या मार्गावर रांगा लागतात. त्यात काही महिन्यांपूर्वी महामार्गावर टँकर उलटल्यामुळे 32 तास वाहतूक कोंडी झाली होती. बऱ्याच काळापासून महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार आहे. पण प्रत्यक्षात काम कधी सुरू झालं नाही. आता सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीनंतर प्रशासनाला जाग आली असून येत्या पावसाळ्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला दहा पदरी करण्याचं काम सुरू होणार आहे.

    टोल वसुलीचा कालावधी वाढणार

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या 94.6 किमी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.2026मध्ये सुरू झालेलं हे काम 2029-30पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या रुंदीकरणाच्या अर्थसहाय्य देण्यासाठी अधिकाऱ्यांनी हायवेवरील टोल वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे 2045 असलेली अंतिम मुदत 2060 होण्याची शक्यता आहे. तसेच, वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे MSRDCला स्वतंत्रपणे निधी उभा करावा लागणार आहे.Maharashtra TimesPune News: पुण्यातील 12 ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांना गती, बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण होणार; 30 वर्षांपासून रखडलेला मार्ग अंतिम टप्प्यात

    MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच, महामार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काम हाती घेतलं जाणार आहे. या वर्षी काम सुरू झालं तर हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. आधीपासूनच आवश्यक जमीन उपलब्ध असल्यामुळे 2029 ते 30 पर्यंत महामार्गाचा विस्तार पूर्ण होईल.

    एका महिन्यात ‘मिसिंग लिंक’

    या प्रकल्पासाठी एकूण 14,260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज अंदाजे 65,000 वाहनं हाताळली जातात. वीकेंडला तर ही संख्या एक लाखावर पोहोचते. तसेच, दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. येत्या मे महिन्यात 13 किमी लांब ‘मिसिंग लिंक’ मार्ग सुरू होणार आहे. हा रस्ता सुद्धा 10 पदरी असून खंडाळा घाटातून जाणारा या मार्गामुळे नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण तरीही वाहनांची वाढती संख्या पाहून द्रुतगती मार्गाचंही रुंदीकरण आवश्यक आहे.

    Maharashtra TimesPune Weather: मान्सूनपूर्वीच पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, अवकाळीमुळे हवामान बदललं; 2016नंतर एप्रिलमधील नीचांकी तापमानाची नोंद

    नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुरू होणार हा महामार्ग पुण्यातील किवळेपर्यंत विस्तारलेला आहे. 2002मध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा