• Sun. Jun 7th, 2026

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’

    Maharashtra Weather: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’

    Weather Alert 5 April: राज्यात एप्रिलच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी कमी झाला होता. रविवारी, राज्यातील काही भागांत पासाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हवामान झपाट्याने बदलतं आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावासचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे, रविवारी, 5 एप्रिलदरम्यान, अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वारांवर बदलत्या हवामानामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

    राज्याती हवामान कसं असेल?

    मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरसह कोकणातील काही भागांत दिवसभर उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.5 एप्रिल रोजी, मुंबईत कमाल तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे संरक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.Maharashtra Timesपिके मातीमोल! राज्यात अवकाळीने 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका; 29 जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
    तसेच, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अलर्ट नाही. पण चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वीजांसह पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अदांज असून वादळाच्या वेळी नागरिकांना मोकळ्या जागेवर जाणे टाळून निवारा घेण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सध्या कोणताही अलर्ट नसला तरी बदलत्या वाऱ्यांमुळे काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Weather Alert: महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात कोसळणार; पुढील 24 तास इशारा

    ‘आयएमडी’ कडून ऑरेंज अलर्ट

    भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शनिवारी अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या सर्व ठिकाणी गारपीट, मेघगर्जना, वीज आणि ताशी ६०-७० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला आहे. अलर्ट दिलेल्या राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पूर्व उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या भागांचा समावेश आहे. पुढील २४ तासांत या प्रदेशांमध्ये गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह तीव्र हवामान बदलाची शक्यता आहे, असेही ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा