नागपूर : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली होत असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या निवडणुकीत उमेदवार देऊ नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केल्याचे समजते. तर दुसरीकडे, बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि सर्वच राजकीय पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला साजेसा निर्णय घेत सर्वांनी एकमताने ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात यापूर्वीही अनेकदा पोटनिवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी सर्वपक्षीय सहमतीने निवडणूक बिनविरोध झाली होती.”
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात घडलेल्या भीषण अपघातावरही देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना एका कारचा ताबा सुटून ती रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा अशा प्रकारे मृत्यू होणे अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखद घटनेपेक्षा मोठा आक्रोश असू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.
प्राथमिक तपासात रस्त्याच्या अगदी समोरच विहीर असल्यामुळे आणि तिच्या संरक्षणासाठी असलेली भिंत कमी उंचीची असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारकडून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, राज्यभरातील अशा धोकादायक ठिकाणांचे तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे रस्त्यालगत विहिरी किंवा अन्य धोकादायक संरचना आहेत, तिथे योग्य सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. कारण त्या विहिरीला भिंत होती पण ती छोटी होती. त्यामुळे या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा