Chhatrapati sambhajinagar news: सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलिस अधिकारी हे माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोपही सदर तरुणाने शेवटच्या चिठ्ठीतून केला आहे.
आई, मला माफ कर, मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही; तरुणाचं टोकाचं पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर: “आई, ही माझी शेवटची माफी असावी… मी तुला दिलेला जिवाचा शब्द पाळू शकलो नाही, मला माफ कर,” अशा हृदयद्रावक ओळी लिहून जय भवानीनगर येथील २६ वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. २१ लाखांच्या कर्जाचा डोंगर आणि चोरीला गेलेल्या ट्रकचा तपास न लागल्याने खचलेल्या या तरुणाची सुसाईड नोट वाचताना उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला.
संदेश दिनकर गवळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संदेशने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या आशेने २१ लाख रुपयांचे कर्ज काढून स्वतःचा ट्रक खरेदी केला होता. घरची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संदेशचा हा ट्रक अवघ्या काही दिवसांतच चोरीला गेला. चिकलठाणा पोलीस ठाण्यात धाव घेऊनही दीड वर्ष झाले तरी ट्रकचा पत्ता लागला नाही. दुसरीकडे, ट्रकचा विमा नसल्याने बँकेचे हप्ते आणि व्याजाचा बोजा वाढतच गेला.
सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर गंभीर आरोप विष प्राशन करण्यापूर्वी संदेशने दोन पानांची सविस्तर चिठ्ठी लिहिली आहे. यात त्याने पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चिकलठाणा पोलिसांनी चोरांशी हातमिळवणी करून माझा घात केला. सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेले अधिकारीच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत, असे त्याने या पत्रात नमूद केले आहे. आपल्या अपयशाचे खापर स्वतःवर फोडले जात असताना, हतबल होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
आईची माफी अन् शेवटची इच्छा सुसाईड नोटचा शेवट संदेशने अत्यंत भावुक शब्दांत केला आहे. त्याने आपल्या आईची माफी मागितली असून, माझ्या आईची नीट काळजी घ्या, अशी विनंती नातेवाईकांना केली आहे. तसेच बँकेकडून विम्या संदर्भात काही मदत मिळू शकते का, हे पाहण्याचे आवाहनही त्याने चिठ्ठीत केलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा