Sindhudurg Karul Ghat Accident Father Son Death : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटेनत वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
करुळ घाट ट्रक अपघात वडील मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारूळ घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली आहे. या घाटात सिमेंटने भरलेला एक ट्रक कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
बाप-लेकांचा जागीच मृत्यू
सिमेंटने भरलेला ट्रक करूळ घाटात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळल्यानं मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. करुळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. Pune Rain : ढग दाटून आले, गगनी काळोख संचारला, पुण्यात पावसाचा धुमाकूळ, जिकडेतिकडे पाणीच पाणी
परिसरा हळहळ
यावेळी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री जीव रक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील, प्रदीप मोरे, राजेंद्र वारंग, रविंद्र सावंत, विजय सावंत, विजय पवार, रत्नकांत राशिवटे, रविंद्र चव्हाण, आनंद शिंदे, अमर शिंदे, रघुनाथ चव्हाण, गौरव मोरे, सागर पडवळ, सत्यविजय मोरे, वसंत पाटील आदी उपस्थित होते. तसेच भैरीभवानीचे मालक गिरीधर रावराणे व ग्रामस्थांनीही बचावकार्याला सहकार्य केलं. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सगळ्यांच्या लाडक्या लाडोबाने स्वत:ला संपवलं
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमधील जिल्ह्यातील देवगडमध्ये देखील अशीच काहीशी घटना समोर आली होती. देवगड एसटी आगारात वाहक म्हणून सेवेत असलेल्या ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. लाडोबा उर्फ नाना मेघश्याम लाड (वय ३५) असं आत्महत्या केलेल्या वाहक युवकाचं नाव आहे. लाडोबा हा देवगड एसटी आगारात वाहक म्हणून गेली १५ वर्षे नोकरीस होता. अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ वाहक म्हणून त्याची ओळख होती. जीव देण्याआधी चिठ्ठीत भोंदूबाबा Ashok Kharatचं नाव, मग चार्जशीटमधून कसं गायब? युवकाच्या कुटुंबीयांची आता मोठी मागणी कोळंब खडवणनाका येथील लाडोबा मेघश्याम लाड याचं पार्थिव नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला धक्का बसला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा