• Sun. Jun 14th, 2026
    Jalna Samruddhi Highway Accident : भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं, जालन्यात सहा महिलांचा जागीच करुण अंत; अपघातस्थळी लेकरांचा आक्रोश

    Jalna Samruddhi Highway Accident 6 People Dead : जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. २०२४ मध्ये देखील असाच काहीसा अपघात झाला होता.

    समृद्धी महामार्ग कडवंची अपघात सहा महिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला असून, या अपघातात ६ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या

    मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या ट्रकने महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काही महिला मजूर ट्रकखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार माजला होता. अपघाताची माहिती मिळताच तालुका जालना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत मदतकार्य हाती घेतले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला.
    Maharashtra TimesVasai Crime : व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक

    लेकरांचा मन हेलावणारा आक्रोश

    या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, मृतांचा आकडा आणि ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या घटनेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अपघाताचं नेमकं कारण लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांपैकी कुणी रुग्णालयात पोहोचलं तर कुणी अपघातस्थळी पोहोचले. तिथलं दृश्य पाहून लेकरांनी एकच आक्रोश केला.
    Maharashtra TimesPathardi Crime : ऊसतोडीच्या पैशांवरुन वाद, जन्मदात्या बापानेच लहान मुलीसमोर मोठ्या लेकीला संपवलं; बॉडीजवळ आईचा आक्रोश

    दोन वर्षांपूर्वीही असात अपघात

    दरम्यान, २९ जून २०२४ रोजी देखील असाच एक भीषण अपघात याच समृद्धी महामार्गावर झाला होता. यात देखील सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले होते. मृतांमध्ये तीन जण मुंबईमधील मालडचे तर अन्य तिघे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी होते.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा