Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#akshaykardila #shivajiraokardile #bjp #rahurividhansabhaelection #ahilyanagarराहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आई अलका कर्डिले यांच्या भावना अनावर झाल्या. डोळ्यांत अश्रू तर मनात अभिमान असा भावनिक क्षण यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाला. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता अक्षयच्या खांद्यावर आल्याची जाणीव व्यक्त करत, जसे शिवाजीरावांनी सर्वसामान्यांची कामे प्रामाणिकपणे मार्गी लावली, तसेच अक्षयही जनतेसाठी झटणार, असा विश्वास अलका कर्डिले यांनी व्यक्त केला. या क्षणी कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांच्या दीर्घकाळच्या मागणीनंतर अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण असून, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जनतेची सेवा करण्याचा निर्धार अक्षय यांनी व्यक्त केला.