• Mon. Jun 15th, 2026

    बहिणी पाठ फिरवतात, बायकोही साथ सोडते, पण मुलगी बापासाठी जीव धोक्यात घालते; शिवतारेंना लेकीचं किडनीदान, पती शिवदीप लांडेंना अश्रू अनावर

    बहिणी पाठ फिरवतात, बायकोही साथ सोडते, पण मुलगी बापासाठी जीव धोक्यात घालते; शिवतारेंना लेकीचं किडनीदान, पती शिवदीप लांडेंना अश्रू अनावर

    Shivdeep Lande on Mamata Shivtare : मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केल्यानंतर शिवदीप लांडेही भावविवश झाले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. कन्या डॉ. ममता शिवतारे यांनीच विजय शिवतारे यांना एक किडनी दान करत त्यांचे प्राण वाचवले. मुंबईतील खासगी रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ममता यांचे पती आणि आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बायकोसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

    शिवतारेंना किडनीदान

    गेल्या काही वर्षांपासून किडनीविकाराच्या त्रासामुळे विजय शिवतारे यांना डायलिसिसद्वारे उपचार देण्यात येत होते. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केल्यानंतर शिवदीप लांडेही भावविवश झाले आहेत. त्यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

    शिवदीप लांडे यांची पोस्ट काय?

    गौरी,
    आयुष्यात अनेक अडचणी आल्या, संकटं कोसळली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मला कधीच विचलित करु शकली नाही – मी नेहमीच अविचल राहिलो. पण तुझ्या एका निर्णयाने… फक्त एका निर्णयाने मला हलवून सोडलं. जेव्हा तू तुझी किडनी दान करण्याचा निर्णय/निश्चय केलास, तुझ्या वडिलांना नवीन जीवन देण्याचा तो निर्णय. तुझ्या वडिलांप्रति असलेल्या तुझ्या निःस्वार्थ समर्पणाला, त्यागाला आणि चिकाटीला माझा सलाम. नतमस्तक.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन तुतारी’, दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली, शरद पवारांचे खासदार शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा
    गेल्या तीन महिन्यांत… ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या डझनभर वैद्यकीय चाचण्या, हजारो कागदपत्रांचा गुंता, कायदेशीर साखळ्या, हे सर्व तू एकटीनेच सांभाळलेस. मी? मी फक्त एक मूक प्रेक्षक म्हणून तुला पाहत राहिलो, आणि विचार करत राहिलो की देवाने मानवी जीवनात मुलीला का पाठवलं असेल. कदाचित आज मला या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे की, कदाचित आईचा आधार मानवी जीवनात फक्त एका टप्प्यापुरता टिकतो आणि त्या आईच्या आयुष्यातील उणीव देव मुलीच्या रुपात पूर्ण करतो. सर्व वयोगटांत.

    महिला आयोग काय काय करू शकतं? अधिकारांमध्ये किती ताकद?

    आज मुंबईच्या त्या आयसीयूमध्ये… किडनी ट्रान्सप्लांटनंतर… जेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझ्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होतो, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले… मी ते थांबवू शकत नाही. का? हे अश्रू का थांबत नाहीत?
    Maharashtra TimesUddhav Thackeray : आपण गाफील राहिलो, भाजपने लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला अधिक मेहनत घेतली; उद्धव ठाकरेंचं चिंतन, आता आपण झटायला हवं
    आज मला समजलं. नातेवाईकांमध्ये, भाऊ सोडून जातात, मुलगे पाठ फिरवतात, बहिणी दूर जातात, अगदी बायकोसुद्धा… या जीवन-मरणाच्या रणांगणात सोबत निघून जातात. पण मुलगी? ती निस्वार्थपणे उभी राहते. अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून. तुझे डोळे मिटलेले आहेत, गौरी. पण तुझं प्रेम, तुझा त्याग प्रत्येक वडिलांना शिकवतो की मुली हे देवाने दिलेले सर्वात मोठे वरदान आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा