• Sun. Jun 14th, 2026
    IPL सुरु असताना धक्कादायक बातमी, BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा हॉटेल ट्रायडंटमध्ये मृत्यू, रुममध्ये बॉडी सापडली

    BCCI Broadcast Engineer Death : ब्रिटिश नागरिक इयान विल्यम्स लँगफोर्ड हे २४ मार्चपासून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत असून त्यांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होऊन आठवडाही उलटला नसताना एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयसाठी IPL 2026 सामन्यांचे ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करणारे ब्रिटिश नागरिक Ian Williams Langford यांचा अकस्मात मृत्यू झाला. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमधील खोलीत इयान विल्यम्स लँगफोर्ड मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    ब्रिटिश नागरिक इयान विल्यम्स लँगफोर्ड हे २४ मार्चपासून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहत होते. आयपीएल सामने कव्हर करण्यासाठी ते भारतात आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे.

    नेमकं काय झालं?

    २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगला. मॅचनंतर ते हॉटेल रुम नंबर 2715 मध्ये गेले. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनिस्टने त्यांच्या रुममध्ये कॉल केला. मात्र बराच वेळ त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर हॉटेल स्टाफ त्यांच्या रुमबाहेर जमा झाला. मास्टरकीने दरवाजा उघडून आत पाहिले असता इयान जमिनीवर निपचित पडलेले सापडले.

    हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मरीन ड्राईव्ह पोलिसात अपघाती मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
    Maharashtra TimesCrime News : पोलिसाने चिठ्ठीवर मोबाईल नंबर लिहून ट्रेनमध्ये तरुणीला दिला, व्हिडिओ शूट करताच काढता पाय, नेटिझन्स संतापले

    डीन जोन्सच्या आठवणी ताज्या

    इयान यांच्या निधनामुळे सप्टेंबर २०२० मध्ये आयपीएलदरम्यान निधन पावलेल्या डीन जोन्स यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सुप्रसिद्ध समालोचक असलेले जोन्स कोविड-१९ निर्बंधांमुळे खेळाडूंसह आयपीएलशी संबंधित सर्व कर्मचारी बायो-बबलमध्ये असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते.

    Ashok Kharat Case : ऑफिसबॉय नीरज जाधव आणि भोंदूबाबा समोरासमोर, SIT चौकशीत खरातचा खळबळजनक दावा

    ‘हिट अँड रन’च्या उपनगरांत दोन घटना

    दुसरीकडे, पुणे शहरात हिट अँड रनच्या अपघातांची मालिका सुरूच असून, खराडी व लोणी काळभोर परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Maharashtra TimesShivdeep Lande : बहिणी पाठ फिरवतात, बायकोही साथ सोडते, पण मुलगी बापासाठी जीव धोक्यात घालते; शिवतारेंना लेकीचं किडनीदान, पती शिवदीप लांडेंना अश्रू अनावर
    खराडी येथील फॉरेस्ट पार्क सोसायटी लेन क्रमांक दोनच्या परिसरात २८ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास अपघात झाला. वाघोली परिसरात राहणारा शुभम सुनील देवनाथ (वय २८) दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला वेगात धडक दिली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

    लोणी काळभोर परिसरात २७ मार्चला दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात तेजस संतोष साळुंखे हा दुचाकीस्वार जखमी झाला. अज्ञात काळ्या रंगाच्या कारने त्याला जोरदार धडक दिली. तेजसच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्याच्या मित्राच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असून, बेपत्ता चालकांचा शोध सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा