• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News 30th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली असतानाच आज, ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातदेखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो, असे कृषी विभागाने रविवारी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed