• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : पुणे विमानतळावर 26.80 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई; संत्र्याच्या खोक्यातून चालू होती तस्करी

    Ganja Seized In Pune : पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. थायलंडहून संत्र्याच्या फोडींच्या नावाखाली आणलेला २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटकही केली आहे.

    पुणे विमानतळावर २६ कोटींचे अमली पदार्थ जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (Customs) ड्रग्ज तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला आहे. थायलंडहून चक्क ‘मँडरिन ऑरेंज’च्या बॉक्समध्ये लपवून आणलेला तब्बल ७६ किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २६.८० कोटी रुपये असून, अत्यंत चलाखीने व्हॅक्यूम सीलबंद पाकिटांत हे ड्रग्ज दडवले होते. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

    असा आखला प्लान

    ही संपूर्ण खेळी अगदी स्मार्ट पद्धतीने आखली गेली होती. माल संत्र्याच्या फोडी (मँडरिन ऑरेंज) असल्याचं सांगून थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक करून आणण्यात आला होता. बाहेरून सगळं अगदी नॉर्मल दिसत होतं, त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय येणं कठीण होतं. पण स्कॅनिंग करताना अधिकाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला.

    गांजा असल्याचं समोर आलं

    यानंतर त्यांनी एक बॉक्स उघडून पाहिला आणि खरी गोष्ट समोर आली. आत सीलबंद टिनचे डबे ठेवलेले होते. सुरुवातीला त्या डब्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर दिसत होती. मात्र, नीट तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की ही पावडर फक्त वरवरची होती. त्या पावडरच्या आत व्हॅक्यूम सीलबंद प्लास्टिक पॅकेट्समध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

    Maharashtra TimesWar Effect : जुनं ते सोनं म्हणायची वेळ! गॅस सिलेंडर मिळेना, नागरिक पुन्हा चुलीकडे वळले, पण जंगलतोड वाढली

    किंमत २६.८० कोटी

    यानंतर सगळे बॉक्स तपासले असता एकूण ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या मालाची किंमत जवळपास २६.८० कोटी रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

    एका आरोपीला अटक

    या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. हा माल नेमका कोणासाठी आणला जात होता, आणि यामागे कोणतं मोठं रॅकेट आहे का, याचा आता सखोल तपास सुरू आहे.

    एकंदरीत पाहता, “खाद्यपदार्थ” नावाखाली मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा डाव पूर्णपणे उधळला गेला. त्यामुळे पुन्हा एकदा विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा किती सतर्क आहे, हे समोर आलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा