• Tue. Jun 16th, 2026

    Ashok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार

    Ashok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार

    अशोक खरात प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून अशोक खरात प्रकरणात अतिशय वेगाने तपास सुरु आहे. आतापर्यंत एसआयटीकडे अशोक खरातचे 300 व्हिडीओ सापडले आहेत. तसेच एसआयटीने अशोक खरातच्या कर्मांचा हिशोब मांडण्यासाठी तीन प्रमुख संस्थांना पत्र व्यवहार केल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. अनेक पीडित महिला त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आता पुढे येत आहेत. या प्रकरणी पोलीस आता सखोल तपास करणार आहेत. खरातच्या संपत्तीपासून ते वेगवेगळ्या अँगलने आता तपास होणार आहे. IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वातील SIT या प्रकरणी सखोल तपास करत आहे. एसआयटीकडून या प्रकरणी महत्त्वाचा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

    एसआयटीने आयकर विभाग, मुद्रांक शुल्क नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागासोबत पत्र व्यवहार केला आहे. अशोक खरातची संपत्ती, मालमत्ता, आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलं आहे. अशोक खरातच्या मालमत्तांच्या चौकशीसाठी मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. अशोक खरातच्या परदेश दौऱ्यांच्या माहितीसाठी पासपोर्ट विभागाला देखील पत्र पाठवलं आहे. एसआयटीने या तीनही विभागांना पत्र पाठवून माहिती मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    भोंदू अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ 2024 मधील असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित व्हिडीओ हे दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीतील असल्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टी हेच सर्व काळे कर्माचे केंद्र असल्याचे देखील तपासात समोर आले आहे. अशोक खरातचे 300 पेक्षा जास्त व्हिडीओ एसआयटीच्या हाती लागले असल्याची माहिती मिळत आहे.

    खरातला पुन्हा कोर्टात आणलं

    अशोक खरात याला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खरात याच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांना अधिक तपासासाठी खरातच्या कोठडीची मागणी केली. सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि पोलिसांनी भक्कमपणे बाजू मांडली. आरोपी अशोक खरात तपासात सहकार्य करत नाही, त्याच्याकडे मोठी मालमत्ता आहे. या गुन्ह्यामध्ये खरात याचे नेमके कोण कोण साथीदार आहेत, आणि जप्त केलेल्या मोबाईलमधील माहितीचा तांत्रिक तपास बाकी आहे, अशी बाजू सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली.

    तक्रारदार महिलांना खरात जे पाणी प्यायला देत होता, त्याबाबत देखील पोलिसांना संशय आहे, त्या पाण्यामध्ये गुंगीकारक द्रव्य होते का? याचा तपास होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे लांबपर्यंत पसरले असू शकतात. पोलीस या प्रकरणात आता खरातच्या घराच्या मालमत्तेची सखोल माहिती मिळवणार आहेत. तसेच पोलीस त्याच्या संपर्कातील इतर संशयितांचीही चौकशी करणार आहेत. या वाढीव कोठडीमुळे आता पोलिसांच्या हाती नेमके काय पुरावे लागतात आणि या रॅकेटमध्ये अजून कोणाची नावे समोर येतात? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा