Pune Crime: आरोपींच्या हल्ल्यात उपाहारगृहचालकाच्या सहकाऱ्याचा हात मनगटापासून तुटून वेगळा झाला असून, चालकाच्या डोके व खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.
किशोर राजू बनसोडे (वय २९) आणि प्रसाद चंद्रशेखर आजुरे (वय २८, दोघे रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी पोम्मीराजा मुथ्थुराज थेवर (वय २४, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, सुनील राजू बनसोडे (वय २६) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Pune University: पुणे विद्यापीठात तरुणींसमोर ‘डिलिव्हरी बॉय’चं विचित्र वर्तन; परदेशी विद्यार्थिनीची तक्रार, घटनेनं शहरात संताप
बनसोडे आणि आजुरे यांचे महर्षीनगर परिसरात व्यंकटेश्वरा अमृततुल्य आणि व्यंकटेश्वरा वडेवाले उपाहारगृह आहे. थेवर हा बनसोडे यांच्या उपाहारगृहासमोर हातगाडी लावून दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विक्री करतो. त्यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून वाद झाले होते. त्यामुळे बनसोडे यांनी त्याला हातगाडी लावू नको, असे सांगितले. या कारणावरून त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे होत होती. त्यातच बनसोडे यांनी खाद्यपदार्थांचे दर कमी केले होते. त्या रागातून थेवरसह तिघे जण दुपारी बनसोडेच्या उपाहारगृहात घुसले. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्रे आणि दांडक्याने बनसोडे आणि आजुरे यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी केलेला वार आजुरे याने हातावर झेलला. त्यात त्याचे मनगट तुटले, तर बनसोडे यांच्या डोके आणि खाद्याला गंभीर जखम झाली. या दोघांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजुरे याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून, बनसोडे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे स्वारगेट पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, सहायक निरीक्षक अभिजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
Rishikesh Vaidya : ऋषिकेश वैद्य प्रकरणात कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद, न्यायालयात काय-काय घडलं?
उपाहारगृहातील गॅस गळतीमुळे भडका
भारती विद्यापीठ परिसरातील एका उपाहारगृहात एलपीजी सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर उडालेल्या भडक्यात चार कामगारांच्या हाताला आणि पायाला भाजले. इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोर तळमजल्यावर असलेल्या नादब्रह्म इडली उपाहारगृहात ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळती रोखली. या दुर्घटनेत आग लागली नसली, तरी उपाहारगृहातील छताचे नुकसान झाले; तसेच खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत.
